शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

राजकीय नेत्यांनी मांडला शेतकरी कारुण्याचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 21:13 IST

अवकाळी पावसाने खरिपातील कापणीला आलेली शंभर टक्के पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. अशा स्थितीत शेतकरी हिताचा नि:स्वार्थ विचार करणारे कोणीही नाही. राजकीय नेते मंडळी केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन कारुण्याचा दिखावा करीत असून त्यातून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीही प्राप्त होणार नाही. अशा स्शितीत शेतकऱ्यांनी कोण आपल्या मदतीसाठी उभा राहतो यावर लक्ष ठेवून आपला मित्र कोण आणि शत्री कोण हे ओळखण्याची गरज असल्याचे मत जेष्ठ कृषी अर्थशास्त्र अभ्यासक डॉ. गिरीधर पाटील यांनी व्यक्त केले आहे.

नाशिक : अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्याने खरिपाच्या सोयाबीन, द्राक्ष, कांदा,  बाजरी, ज्वारी, कापूस यासोबतच  पालेभाज्या , फळभाज्या आदि पिकांचे अगणीत नूकसान होऊन शेतकरी  कोलमडला आहे. अशा स्थितीत शेतकºयांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न  अपेक्षित अशताना सध्या राजकारण्यांनी शेतकऱ्यांच्या कारुण्याचा बाजार मांडला आहे. तर प्रशासनाकडून अतिवृष्टीग्रस्त गावांचे सरसकट पद्धतीने  अंदाजे पचंनामे करून भ्रामक आकडेवारी दिली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात झालेले नूकसान हे शासकीय आकडेवारीच्या  कितीतरी पटीने अधिक असल्याचे या आकडयांची पडताळणी केल्यास समोर येईल,असे मत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या या संकटाबाबत कृषी अर्थशास्त्राचे तज्ज्ञ. डॉ. गिरीधर पाटील  यांनी ‘लोकमत’शी  बोलताना व्यक्त केले आहे. 

प्रश्न- अतिवृष्टीमुळे वाया गेलेल्या खरीपाचा शेती क्षेत्रावर काय परिणाम होईल?पाटील - मान्सूच्या आगमनानंतरही काही भागात  दुष्काळाच्या झळा कायम होत्या. चांगला पाऊस झाला तिथे आलेले पिक परतीच्या पावसाने पूर्ण वाया गेल्याने शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचला आहे. शेतकऱ्यांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकारकडून मिळणारी तुटपुंजी मदतही राज्यात सरकारच नसल्याने  अद्याप मिळू शकलेली नाही. शासकीय यंत्रणातर केवळ सातव्या वेतन आयोगासाठीच काम करतात की काय असा प्रश्न निर्माण होतो. अतिवृष्ट बाधित गावांमध्ये सरसकट नुकसान दाखविल्याने  प्रत्यक्ष वास्तिविकता समोर येत नाही. 

प्रश्न- अवकाळी संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करणे गरजेचे आहे?पाटील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या प्रयत्नांमध्ये शेतकरी वगळता इतर सारे घटक सक्षम व पुष्ठ होत जातात शेतकरी तसाच राहतो. आणि इतर घटक मात्र त्याच्या कारुण्याचा बाजार मांडत त्यांचा स्वार्थ साधत राहतात.  त्यामुळे अशा संकटांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी राजकीय भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यांनी आपला शत्रू आणि मित्र ओळखण्याची गरज आहे. राजकारणासह, बाजार समिती, अडते, व्यापारी यासर्वंच्या बाबतीत हाच निकष लावण्याची गरज आहे.

मुलाखत -नामदेव भोर

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकRainपाऊसGovernmentसरकारFarmerशेतकरी