ईडीच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:13 IST2020-12-29T04:13:12+5:302020-12-29T04:13:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : आतापर्यंत चांगली असलेली अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) विश्वासार्हता धोक्यात आली असून, त्यांच्या कारवाईत सातत्याने राजकीय ...

Political interference in the actions of the ED | ईडीच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप

ईडीच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : आतापर्यंत चांगली असलेली अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) विश्वासार्हता धोक्यात आली असून, त्यांच्या कारवाईत सातत्याने राजकीय हस्तक्षेप दिसून येत असल्यामुळे त्यांची प्रतिमाही मलीन होऊ लागली आहे. राजकीय फायद्यांसाठी ईडीचा वापर करणे अयोग्य असल्याचे विधान राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे ईडीच्या कार्यवाहीला निश्चितपणे सामोरे जातील, असा विश्वासही त्यांनी नाशिक जिल्हा दौऱ्याप्रसंगी राष्ट्रवादी भवनातील कार्यक्रमात व्यक्त केला.

जिल्हा दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे युवानेते आमदार पवार यांनी राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले विरोधकांकडून समाजमाध्यमांचा वापर हा सरकारवर टीका करण्यासाठी आणि खोटेनाटे आरोप करण्यासाठीच हेतुपुरस्सर केला जात आहे. कोणत्याही लहानसहान विषयाला वेगळे वळण देऊन समाजमाध्यमांवर त्याचा गवगवा केला जातो. त्यामुळे मूळ प्रश्नांपासून लक्ष दुसरीकडे वळविण्याचे विरोधकांचे प्रयास असले, तरी ते सफल होऊ दिले जाणार नाहीत, असे ते म्हणाले. केंद्र शासनाकडून राज्यशासनाला हक्काच्या जीएसटीचा वाटाही दिला जात नसून, केंद्राने अनेकदा शेतकऱ्यांचीही फसवणूक केली आहे. महाविकास आघाडी लोकांचे प्रश्न सोडविण्यास प्रयत्नशील असल्याचे पवार यांनी यावेळी नमूद केले. यावेळी आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे आणि अन्य प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते दिवसभरात पवार यांनी पळसे, नाशिक रोड, मुंबई नाका, फ्लॉवर पार्क, तसेच वणीच्या देवीदर्शनासह डोंगर देव या आदिवासी समूहाच्या पारंपरिक कार्याला उपस्थिती लावली.

=---इन्फो----

आमदार नियुक्तीत विलंबावर आक्षेप

राज्यातील आमदारांच्या नियुक्तीबाबत खूपच विलंब होत असून, ही कृती आक्षेपार्ह असल्याची टीका आता सामान्य नागरिकांकडूनही होऊ लागली आहे. देशातील प्रत्येकाने संविधानाचा सन्मान करून, त्याप्रमाणेच पदाचा उपयोग करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

(फोटो: २७पीएचडीसी६७)

कॅप्शन: राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रोहित पवार. व्यासपीठावर रंजन ठाकरे, दिलीप बनगर, कोंडाजीमामा आव्हाड, निवृत्ती अरिंगळे आदी.

Web Title: Political interference in the actions of the ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.