भटकणाऱ्यांना पोलिसी खाक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 17:12 IST2020-03-24T17:12:08+5:302020-03-24T17:12:34+5:30

अभोणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची अभोणा पोलिसांकडून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. संपूर्ण शहर परिसरात पोलीस फिरत आहे.

 Policy Khaki for Wanderers | भटकणाऱ्यांना पोलिसी खाक्या

भटकणाऱ्यांना पोलिसी खाक्या

अभोणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची अभोणा पोलिसांकडून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. संपूर्ण शहर परिसरात पोलीस फिरत आहे. संचारबंदीत कोणीही घराबाहेर फिरू नये, असे आवाहन केले जात आहे. मात्र काही अतिउत्साही नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करीत चारचाकी, दुचाकीवरून शहरात फेरफटका मारण्याचा केलेला प्रयत्न त्यांना महागात पडला. त्यांना पोलिसांच्या दंडुक्याचा चांगलाच प्रसाद खावा लागला. दरम्यान शहर चौफुलीकडे (कळवण-नांदुरी-चणकापूर-कनाशी) येणारे चारही रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. सहायक निरीक्षक उमाकांत गायकवाड, उपनिरीक्षक बागुल हे पोलीस ताफ्यासह शहर परिसरात गस्त घालीत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत .

Web Title:  Policy Khaki for Wanderers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक