Policeman rides a motorcycle wearing no helmet! | ओझरला हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांकडून गुलाबपुष्प !
ओझरला हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांकडून गुलाबपुष्प !

ओझर : महामार्ग वाहतुक नियंत्रक कक्ष व ओझर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मुंबई आग्रा महामार्गावर दहावा मैल चौफुलीवर हेल्मेटचा वापर न करणा-या दुचाकीस्वारांना व सिट बेल्ट न लावणा-या चालकांचा गांधीगिरी पध्दतीने गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. केवळ हेल्मेटचा वापर न केल्याने अपघातात मुत्युमुखी पडल्याचे प्रमाण वाढत चालले असुन पोलिसांचा वाहतुक विभाग देखील या बाबत अनेक वेळा विविध मोहीमा राबवत या दुचाकीस्वारांवर कायदेशीर कारवाई करीत आहे समाजमाध्यमामधुन तसेच वाहतुक सप्ताहाअंर्तगत हेल्मेट वापरा बाबत तसेच सीटबेल्ट लावण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम व प्रबोधन करण्यात येत आहे शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करूनही अजुन देखील दुचाकीस्वार या बाबत गंभीर नसल्याने मुंबई आग्रा महामार्गावरील दहावा मैल चौफुलीवर हेल्मेटचा वापर न करणा-या दुचाकी स्वारींना व चारचाकी चालवतांना सीटबेल्ट चा वापर न करणा-या चालकांना गांधीगिरीने गुलाबपुष्पे देऊन हेल्मेट व सीटबेल्ट वापराचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व महामार्ग वाहतुक नियंत्रण कक्षाच्या सहा.पोलीस निरीक्षक वर्षा कदम यांनी हेल्मेट चा वापर न करणा-या चालकांना विनंती करीत कायद्याचे पालन करतांना स्वताच्या जीवाची काळजी घेण्यासाठी हेल्मेट चा वापर करा असे आवाहन केले.यावेळी महामार्ग वाहतूक नियंत्रक सहाय्यक पोलीस निरिक्षक वर्षा कदम, उत्तम गोसावी, उमेश कुलकर्णी, तुषार झोडगे, सोमनाथ चौधरी, बाळासाहेब वाघ, चंद्रशेखर असोलकर, मनोज कावळे, सुदर्शन सारडा, अमर आढाव यांच्यासह पोलीस हवालदार यादव, अनुपम जाधव, भास्कर पवार, बाळासाहेब पानसरे, अरूण शिंदे, एकनाथ हळदे, वाहतुक नियंत्रण कक्षाचे गुंजाळ गोलवड राठोड आदि उपस्थित होते.

Web Title:  Policeman rides a motorcycle wearing no helmet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.