शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

‘खाकी’ला लक्ष्य करणारा पोलीस अद्याप फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:56 IST

कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर असलेल्या गस्तपथकाला मिळालेल्या कॉलनुसार द्वारका येथे सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी सीआर मोबाइल वाहनातून पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात वाजवून अश्लील शिवीगाळ करणारा पोलीस अधिकारी अद्याप फरार आहे,

नाशिक : कोम्बिंग आॅपरेशनदरम्यान भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर असलेल्या गस्तपथकाला मिळालेल्या कॉलनुसार द्वारका येथे सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी सीआर मोबाइल वाहनातून पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात वाजवून अश्लील शिवीगाळ करणारा पोलीस अधिकारी अद्याप फरार आहे, हे विशेष. पळशीकर यांना निलंबित करण्यात आल्याचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास द्वारका येथे सुरू असलेल्या भांडणामुळे जमलेली गर्दी हटवून कायदासुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करणारे पोलीस शिपाई सचिन चौधरी द्वारका येथे दाखल झाले. यावेळी संशयित सहायक उपनिरीक्षक पळशीकर हे एका अस्लम तस्सवूर शेख नावाच्या इसमासोबत वाद घालताना आढळले. चौधरी यांनी दोघांची समजूत काढून वाद मिटवून घरी जाण्यास सांगितले. मात्र याचा राग मनात धरून पळशीकर याने ‘तू आताचा शिपुरडा मला काय शिकवितो, तुला माहीत आहे का मी कोण आहे...’ अशा शब्दांत संवाद साधत त्यांच्या कानशिलात लगावली. दरम्यान, चौधरी यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांना घटनेची माहिती दिली. सूर्यवंशी यांनी गुन्हे शोध पथकाचे वाहन पाठवून तत्काळ मदत दिली. पोलिसांचे वाहन घटनास्थळी आले असता संशयित आरोपीदेखील ‘खाकी’वाला आणि फिर्यादीही पोलीस असल्याचे बघून तेदेखील चक्र ावले. कारवाई करावी तर कोणावर? असा प्रश्न त्यांना पडला. दरम्यान, चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी पळशीकरविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.घडलेली घटना निंदनीय असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही मान्य केले असून, या प्रकरणी गंभीर दखल घेत संशयित पळशीकरविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपआयुक्त पाटील यांनी त्याला अटक करण्याचे आदेशही भद्रकाली पोलिसांना दिल्याचे समजते.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक