पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: September 8, 2016 01:38 IST2016-09-08T01:38:23+5:302016-09-08T01:38:33+5:30

पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न

The police tried to kill the policeman | पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न

पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न

 नाशिकरोड : तपोवनरस्त्यावर नाकाबंदी करणाऱ्या पोलिसाच्या अंगावर रिक्षा घालुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपनगर पोलीस ठाण्याचे हवालदर व्ही. आर. घोलप हे सोमवारी रात्री तपोवन रस्त्यावर बॅरिगेटस् लावलेल्या ठिकाणी नाकाबंदी ठिकाणी कार्यरत होते. यावेळी नाशिक-पुणे महामार्गावरील आयनॉक्स चित्रपट गृहामार्गे रिक्षा (एमएच १५ ईएच १७४४) हिच्यामधील संशयित रिक्षाचालक सागर शिवाजी नाईक, नितीन अशोक वाडकर, रोहित नाईक, रोहित हळदणकर व ज्ञानेश्वर वाघमारे सर्व रा. हिरावाडी, पंचवटी हे येत असतांना त्यांना पोलीस हवालदार घोलप यांनी थांबण्याचा इशारा केला.
मात्र रिक्षाचालक सागर नाईक याने घोलप यांच्या अंगावर रिक्षा घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पाचही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही संशयितांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. बुधवारी त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची मध्यवर्ती कारागृहात
रवानगी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The police tried to kill the policeman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.