शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
4
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
5
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
6
Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
7
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
8
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
9
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
10
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
11
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
12
Maharashtta Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
13
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
14
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
15
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
16
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
17
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
18
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
19
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
20
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी

गुन्हेगारांवर वचकसाठी पोलीस कडक वागतो :  मधुकर कड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:50 AM

गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून पोलीस कडक वागतो. परंतु सामान्य माणसांसाठी पोलीस हा संवदेनशील माणूस असून, तो त्यांचा मित्र असतो, असे प्रतिपादन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी केले.

सिडको : गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून पोलीस कडक वागतो. परंतु सामान्य माणसांसाठी पोलीस हा संवदेनशील माणूस असून, तो त्यांचा मित्र असतो, असे प्रतिपादन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी केले.  माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्याेदय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मधुकर कड यांनी ‘पोलिसामधील माणूस’ या विषयावर गुंफले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुधीर कावळे, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे उपस्थित होते.यावेळी कड यांनी सांगितले की, गुन्हेगारी रोखण्यासाठी आम्हाला कडक वागावे लागते. परंतु सामान्य माणसांसाठी आम्ही मित्र म्हणून मदत करतो. रोज पोलीस स्टेशनमध्ये असंख्य नागरिक तक्र ारी घेऊन येतात. आपापसातील भांडणे आम्ही सामोपचाराने सोडवून देतो. पोलीस स्टेशनमध्ये जेवढे गुन्हे दाखल होतात त्याहीपेक्षा आम्ही भांडणे समजुतीने सोडवून देतो. परंतु वर्तमानपत्रांमध्ये वर्षभरात किती गुन्हे घडले हे प्रसिद्ध होते. पण एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये किती गुन्हे पोलिसांनी सकारात्मकरीत्या सोडविले हे येत नाही. त्यामुळे काहीवेळा पोलिसांना त्रास होतो. तरीही कर्तव्याच्या भावनेतून पोलीस अधिकारी व कर्मचारी कायमच नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत राहतात असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सोनार यांनी केले. जयराम गवळी यांनी आभार मानले.कायमच कर्तव्य दक्षअपघाताच्या ठिकाणी लोक फोटो काढण्यास प्राधान्य देतात, परंतु अपघात झाल्यानंतर मदतीसाठी सर्वप्रथम पोलीसच असतो. दिवाळी, दसरा आणि ईद या सणांची सुटी न घेता पोलीस काम करीत असतात. परंतु त्यालाही कुटुंब असते, तोही माणूस आहे. त्यांनाही सुख- दु:ख, लग्न, मुलांचे शिक्षण असतात. त्याच्यावर इतरही कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात याचा कोणी विचार करीत नाही. तरीही तो जनतेसाठी नेहमीच सेवा देण्यास तयार असतो, आम्हाला कायमच कर्तव्य दक्ष राहावे लागते असेही कड यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस