इगतपुरीजवळ पोलिसांनी रेव्ह पार्टी उधळली; २२ जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 11:35 IST2021-06-27T11:32:27+5:302021-06-27T11:35:11+5:30
पार्टीमध्ये फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या 4 महिलांचा समावेश; बिग बॉसमध्ये भाग घेतलेल्या एका महिलेचाही सहभाग

इगतपुरीजवळ पोलिसांनी रेव्ह पार्टी उधळली; २२ जणांवर कारवाई
इगतपुरी (नाशिक) : इगतपुरीत आज पहाटेच्या सुमारास मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज विला या बंगल्यावर रेव्ह पार्टीची गुप्त बातमी मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी धाड मारून केली कारवाई केली.
सदर विलात रेव्ह पार्टी चालू होती. या पार्टीमध्ये फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या 4 महिलांचा समावेश तसेच एक बिग बॉसमध्ये भाग घेतलेल्या एका महिलेचा समावेश आहे. यात दहा पुरुष व बारा महिलांचा समावेश होता. एकूण 22 जणांवर कारवाई करण्यात आली.