शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या गुन्ह्यातील पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 19:18 IST

नाशिक : आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देऊन गत साडेतीन वर्षांपासून मुंबईच्या अंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक साजन सानप (रा. मंजुळा मंगल कार्यालयामागे, नाशिकरोड) हा बलात्कार करीत असल्याची फिर्याद जेलरोड परिसरातील शिक्षिका तसेच शहरातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने उपनगर पोलिस ठाण्यात दिली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित उपनिरीक्षक सानपविरोधात विनयभंग, बलात्कार तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सानप याने पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़२७) घडली आहे़

ठळक मुद्देसानपविरोधात विनयभंग, बलात्कार तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा

नाशिकरोड : आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देऊन गत साडेतीन वर्षांपासून मुंबईच्या अंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक साजन सानप (रा. मंजुळा मंगल कार्यालयामागे, नाशिकरोड) हा बलात्कार करीत असल्याची फिर्याद जेलरोड परिसरातील शिक्षिका तसेच शहरातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने उपनगर पोलिस ठाण्यात दिली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित उपनिरीक्षक सानपविरोधात विनयभंग, बलात्कार तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सानप याने पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि़२७) घडली आहे़

उपनगर पोलीस ठाण्यात पिडीत शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार या महिलेचा पती मुंबईत पोलीस दलात असताना संशयित साजन सानपही तिथे नियुक्तीस होता. पिडीत महिला व सानप हे जेलरोड परिसरातच राहत असल्याने पतीमुळे या दोघांची ओळख झाली. एप्रिल २०१४ मध्ये घरात स्वयंपाक करताना महिला जखमी झाल्याने तिला पाहण्यासाठी सानप तिच्या घरी आला होता़ यानंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरु झाले होते, त्यातच काही कारणावरून सानपने महिलेला तिच्या पतीविरूद्ध भडकविण्याचा प्रयत्न केला. तसेच पतिविरूद्ध पुरावा देण्याच्या बहाण्याने त्याने या महिलेशी जवळीक साधली. तिचा पाठलाग सुरु केला. मे २०१४ मध्ये सानपने याने महिलेस माझ्याकडे तुझे खाजगी फोटो असून माझ्या मनासारखी वागली नाहीस तर फेसबुकवर फोटो अपलोड करण्याची धमकी दिली़

२ जून २०१४ रोजी या महिलेच्या घरी सानप मद्यपान करु न गेला व तिलाही मद्य पाजून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास पतीस सांगण्याची तसेच आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर साडेतीन वर्षे अशा प्रकारे त्याने या महिलेवर अत्याचार केले. तसेच ही बाब सांगितल्यास पतीची नोकरी घालविण्याची व त्याला ठार मारण्याची धमकीही सानपने दिली. महिलेने हा प्रकार पतीला सांगितल्यानंतर प्रारंभी पतीचा विश्वास बसला नाही. त्यामुळे महिलेने पतीला साजन सानपचे फोनवर रेकार्ड केलेले बोलणे एकवले. महिला व तिच्या पतीने साजन सानपच्या पत्नीला हा प्रकार सांगितला. तेव्हा सानपने एका पोलिस अधिकाºयाला घेऊन महिलेचे घर गाठले व माफी मागितली. पुन्हा त्रास देणार नाही असे आश्वासन दिले.

त्यानंतरही सानप हा संशयित गणेश आगवणे (रा़ दसक, जेलरोड) या मित्राकरवी महिलेचा पाठलाग करून माहिती गोळा करत राहिला. तसेच या मित्राने महिलेला तिच्या शाळेत जाऊन धमकी दिली. सानपने महिलेच्या मैत्रिणीला फोन करून बदनामी केली. महिलेच्या पतीने सानपला जाब विचारला असता त्याने आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर महिलेने पतीसोबत उपनगर पोलिस ठाणे गाठून सोमवारी (दि़२६) फिर्याद दिली़संशयित पोलीस उपनिरीक्षक सानप यांची आत्महत्या

उपनगर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेले पोलीस उपनिरीक्षक साजन सानप (३७) याने मंगळवारी (दि़ २७) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली़ मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत साजन सानप हे पुण्याहून शिवाजीनगरकडे जात असताना अचानक रेल्वेसमोर जाऊन उभे राहिले. यामध्ये रेल्वेची जोरदार धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ही आत्महत्या नसून अपघात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़ बळजबरीने शारीरिक संबंधपोलीस अधिका-याची पत्नी व व्यवसायाने शिक्षिका असलेल्या महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात संशयित पोलीस उपनिरीक्षक साजन सानप विरोधात बलात्कार व विनयभंगाची फिर्याद दिली आहे़ त्यानुसार मुंबईला असताना सानप याने २१०४ पासून जवळीक निर्माण करून शारीरिक संबंध ठेवले़ यानंतर वेळोवेळी बदनामी करण्याची धमकी देत पाठलाग गेला़ या शिक्षिकेची नाशिकला बदली झाल्यानंतर सानप याने त्याच्याकडील आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ फेसबुकवर टाकण्याची धमकी देत बळजबरीने शारीरिक संबंध करीत होता़ या तक्रारीनंतर सानप पोलीस ठाण्यात आला व संबंधित महिलेस समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला़ मात्र, जेव्हा तक्रार दाखल होते आहे असे समजले तेव्हा ते दुचाकीवर बसून निघून गेले़- श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन, नाशिक़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस