कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी नाकारली कन्हैयाच्या सभेला परवानगी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 02:15 PM2017-10-25T14:15:58+5:302017-10-25T14:22:42+5:30

The police refused permission for the law and order. Kanhaiya's meeting was allowed | कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी नाकारली कन्हैयाच्या सभेला परवानगी 

कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी नाकारली कन्हैयाच्या सभेला परवानगी 

Next
ठळक मुद्देपोलिसांनी कन्हैयाच्या सभेला परवानगी नाकारल्याने नाराजी कन्हैया कुमार यांच्या भाषणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी घेतला कन्हैयाच्या सभेचा धसका

नाशिक : देशभरातील विविध सभांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणा:या कन्हैया कुमारची तोफ नाशकातही धडाडणार आहे. परंतु पोलिस प्रशासनाने गोदाकाठावरील यशवंत महाराज पटांगणावर कन्हैयाची सभा घेण्यास परवानगी नाकारली असून आयोजकांनी मागितलेल्या पर्यायी जागेवरही पोलिसांनी अद्याप सभा घेण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून पोलिस प्रशासनाने कैन्हयाच्या सभेला परवानगी नाकारल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. तसेच कन्हैया कुमार यांच्या भाषणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करीत पोलिसांनी कन्हैयाच्या सभेला परवानगी नाकारल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष व अखील भारतीय विद्यार्थी फेडरेशनचे (एआयएसएफ) चे नेते कन्हैया कुमारची रविवारी(दि.5) दुपारी साडेतीन वाजता तुपसाखरे लॉन्स येथे संविधान जागर सभा होणार असल्याची माहिती विशाल रणमाळे व विराज देवांग यांनी हुतात्मा स्मारक येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. या सभेतून कन्हैया विद्यार्थी व युवकांपुढील आव्हाने, देशाच्या जडणघडणीत विद्याथ्र्यांचे योगदान, विद्याथी संघटनांना उभारी देण्यासाठी अपेक्षित कार्यपद्धती आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहे. शहरातील ऑल इंहिया स्टुडंटस फेडरेशन, छात्रभारती, स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया, सम्यक विद्यार्थी आंदोलन, महाराष्ट्र युवा परिषद, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, प्रगतिशील लेखक संघ, ऑल इंडीया युथ फेडरेशन, डेमॉक्रॅटीक युथ फेडरेशन ऑप इंडिया आदी संघटना संविधान जागर सभेच्या नियोजनात सहभागी असल्याची माहितीही आयोजकांतर्फे देण्यात आली आहे. कन्हैया कुमार यांच्या सभेसाठी प्रारंभी गोदाघाटावरील यशवंत महाराज पटांगण ठरविण्यात आले. परंतु 3 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत कार्तिक पौर्णिमेच्या पारंपारिकउत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे कारण देत पंचवटी पोलिसांनी या सभेची परवानगी नाकारल्याची माहिती विशाल रणमाळे यांनी दिली. त्यामुळे ही सभा आता तुपसाखरे लॉन्स येथे होणार आहे. सभेच्या परवानगी साठी मुंबई नाका पोलीस ठाण्याकडे अर्ज करण्यात आला असून अद्याप सभेला परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे पोलीसांनी कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातत्र्यांवर गदा न आणता परवानगी द्यावी, अशी मागणीही आयोजकांनी केली आहे. 

 

Web Title: The police refused permission for the law and order. Kanhaiya's meeting was allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.