पोलिसभरती मार्गदर्शन शिबीर यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 19:12 IST2019-09-24T19:12:19+5:302019-09-24T19:12:30+5:30
भरविर खुर्द : इगतपुरी तालुक्यातील भरविर खुर्द येथे बालभैरवनाथ फाऊंडेशन तर्फे भरविर खुर्द व परिसरातील युवक-युवतींसाठी मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरासाठी सुमारे ७० युवक-युवती उपस्थित होते.

पोलिसभरती मार्गदर्शन शिबीर यशस्वी
भरविर खुर्द : इगतपुरी तालुक्यातील भरविर खुर्द येथे बालभैरवनाथ फाऊंडेशन तर्फे भरविर खुर्द व परिसरातील युवक-युवतींसाठी मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरासाठी सुमारे ७० युवक-युवती उपस्थित होते.
स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन क्षेत्रात नाशिकमधील अस्तित्व अकॅडमीचे संचालक प्रा. लखन अग्रवाल, प्रा. हर्षल कोठावदे, प्रा. मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
खेड्यातील मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरली असून अशा हिऱ्यांना पैलू पाडण्याची गरज आहे. स्पर्धा परिक्षांमध्ये चमकणारे व यश मिळवणारे जास्तीतजास्त अधिकारी हे खेड्यातीलच असतात असे प्रा.अग्रवाल यांनी उद्घाटनाच्या भाषणात सांगितले.
प्रा. हर्षल कोठावदे यांनीव्याककरणाची पध्दत सोपी करुन सांगितली. तर प्रा. मनोज पाटील यांनी अवघड समजला जाणारा गणित विषय सोपा करु न सांगितला.
त्यानंतर मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. सूत्रसंचलन फाऊंडेशनचे अध्यक्ष तुकाराम सारु क्ते यांनी तर आभार मुरलीधर बांडे यांनी मानले.
(फोटो २४ भरवीर)