मनसेच्या वतीने पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर
By Admin | Updated: May 11, 2014 00:07 IST2014-05-10T16:50:57+5:302014-05-11T00:07:19+5:30
नाशिक : राज्यात आणि नाशिकमध्ये होत असलेल्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करिअर विभागाच्या वतीने युवकांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १७ मे ते ५ जूनदरम्यान सदरचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

मनसेच्या वतीने पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर
नाशिक : राज्यात आणि नाशिकमध्ये होत असलेल्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करिअर विभागाच्या वतीने युवकांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १७ मे ते ५ जूनदरम्यान सदरचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
राज्यात १२ हजार ५०० पोलीस शिपायांची भरती होणार आहे. त्यात नाशिक शहरात ४२३ पदांची भरती होणार आहे. लेखी आणि शारीरिक चाचणी यासाठी होणार आहे. त्यामुळे या चाचण्या उत्तीर्ण होण्यासंबंधीचे मार्गदर्शन राम खैरनार, निवृत्त पोलीस अधिकारी डॉ. जी. आर. पाटील, तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी सानप, मविप्रचे क्रीडा अधिकारी हेमंत पाटील, कैलास लवंड, पद्माकर घुमरे आदि तज्ज्ञ करणार आहेत. या शिबिरासाठी १६ मेपर्यंत इच्छुकांनी राजगड येथे नाव नोंदणी करावी, असे आवाहन आमदार वसंत गिते, करिअर विभागाचे प्रमुख सचिन चव्हाण यांनी केले आहे.