सातपूर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
By Admin | Updated: April 25, 2017 18:54 IST2017-04-25T18:54:40+5:302017-04-25T18:54:40+5:30
सातपूर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

सातपूर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील श्रमिकनगर परिसरात जुगार खेळणाऱ्या चार जुगारींना सातपूर पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकून ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़
श्रमिकनगर परिसरातील हिंदी माध्यमिक शाळेच्या पाठीमागे असलेल्या वीटभट्टीजवळ काही तरुण जुगार खेळत असल्याची माहिती सातपूर पोलिसांना मिळाली होती़ दुपारी चार वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता संशयित रामनाथ गायकवाड व त्याचे तीन साथीदार पत्त्यावर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी या जुगाऱ्यांकडून ८५० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले़ याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)