कबीरनगर परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:13 IST2021-03-20T04:13:47+5:302021-03-20T04:13:47+5:30

नाशिक : गंगापूर शिवारातील संत कबीरनगर भागात बंदिस्त घरात सुरू असलेला जुगार अड्डा पोलिसांनी उद‌्ध्वस्त केला. या कारवाईत ...

Police raid a gambling den in Kabirnagar area | कबीरनगर परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

कबीरनगर परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

नाशिक : गंगापूर शिवारातील संत कबीरनगर भागात बंदिस्त घरात सुरू असलेला जुगार अड्डा पोलिसांनी उद‌्ध्वस्त केला. या कारवाईत सात जुगारींना बेड्या ठोकत पोलिसांनी संशयितांच्या ताब्यातील रोकड आणि जुगाराचे साहित्य असा सुमारे सात हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आहे.

पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने गंगापूर शिवारातील संत कबीरनगर झोपडपट्टीमधील मांगीरबाबा चौक येथे एका बंद घरात कारवाई करीत सात जणांना जुगार खेळताना अटक केली. असू याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनिटचे कर्मचारी विशाल काठे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संतकबीरनगर येथील मांगीरबाबा चौकातील एका बंदिस्त घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला असता प्रसाद उत्तम घोडे (रा.मांगीरबाबा चौक) व त्याचे सहा साथीदार पत्यांच्या कॅटवर तीन पत्ती जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा ६ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Police raid a gambling den in Kabirnagar area