पोलीस अधिकारी स्वागतात व्यस्त; चोरीचा घटनांमुळे लासलगावकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:15 IST2020-12-06T04:15:22+5:302020-12-06T04:15:22+5:30
दि. ५ डिसेंबर रोजी बँक ऑफ बडोदा शाखेत सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सदर घटना कैद झाली असून, सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस तपास ...

पोलीस अधिकारी स्वागतात व्यस्त; चोरीचा घटनांमुळे लासलगावकर त्रस्त
दि. ५ डिसेंबर रोजी बँक ऑफ बडोदा शाखेत सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सदर घटना कैद झाली असून, सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस तपास करीत आहेत. सायंकाळपर्यंत याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये कुठलीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती ठाणे अंमलदारांनी दिली. लासलगाव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ रुजू झाल्यानंतर सदिच्छा आणि शुभेच्छाचा स्वीकार करण्यात मग्न आहेत, त्यांनी गावात फेरफटका मारून अवैध धंदे, चोरीच्या घटना, वाहतूक समस्या याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
येथील स्टेशन रोडवरील बॅंक ऑफ बडोदाच्या टाकळी विंचूर (लासलगाव) शाखेत २ वाजेच्या सुमारास तुषार लोखंडे यांचा डेल कंपनीचा लॅपटाॅप व रोख बावन्न हजार रुपयांची रक्कम घेऊन युवकाने पोबारा केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
===Photopath===
051220\05nsk_36_05122020_13.jpg
===Caption===
लासलगाव चोरी