‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:27 IST2021-03-04T04:27:21+5:302021-03-04T04:27:21+5:30

भद्रकाली पोलीस ठाण्याच्या यादीवरील सराईत गुन्हेगार योगेश धुराजी हिवाळे (२३) याने मंगळवारी (दि.२) त्याच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या ...

‘That’ police officer is under investigation | ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची चौकशी सुरू

‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची चौकशी सुरू

भद्रकाली पोलीस ठाण्याच्या यादीवरील सराईत गुन्हेगार योगेश धुराजी हिवाळे (२३) याने मंगळवारी (दि.२) त्याच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मोबाइलद्वारे व्हिडिओ तयार करून पोलीस ठाण्यातील एका वराडे नामक पोलीस अधिकाऱ्याकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून मजबुरीत फाशी घेत असल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली होती. त्याच्या नातेवाइकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी नातेवाइकांची समजूत काढत या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे साेपविले आहे. यानंतर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचा मोबाइलदेखील जप्त करण्यात आला असून, विविध साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेण्याची प्रक्रिया गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांच्या तपासाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Web Title: ‘That’ police officer is under investigation