नगरसूल येथे पोलिसांचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 17:41 IST2020-08-22T17:39:51+5:302020-08-22T17:41:43+5:30
नगरसूल : गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील नगरसूल येथे तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन करण्यात आले.

नगरसूल येथे पोलिसांचे संचलन
ठळक मुद्देकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
नगरसूल : गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील नगरसूल येथे तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन करण्यात आले. गणपती व ताज मिरवणुकांना बंदी आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे. उत्सव काळात चार व्यक्तींपेक्षा अधिक संख्या आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. जनतेने सुरक्षाचा अवलंब करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी यावेळी सांगितले.