पोलीस यंत्रणा अपयशीच !

By Admin | Updated: May 10, 2017 00:34 IST2017-05-10T00:33:57+5:302017-05-10T00:34:22+5:30

सोनसाखळी चोरीच्या घटना व यशस्वी तपासामधील तफावत पाहता पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जात असून, वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे़

Police machinery fail! | पोलीस यंत्रणा अपयशीच !

पोलीस यंत्रणा अपयशीच !

विजय मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्याबरोबरच चोरट्यांचा शोध घेणे शहर पोलिसांसाठी आव्हान असून, गेल्या सव्वासहा वर्षांचा विचार करता सोनसाखळी चोरीच्या ८४0 घटनांपैकी अवघ्या २६८ गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे़ सोनसाखळी चोरीच्या घटना व यशस्वी तपासामधील तफावत पाहता पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जात असून, वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे़ शहरातील इंदिरानगर, गंगापूर, उपनगर, पंचवटी, नाशिकरोड, म्हसरूळ या पोलीस ठाणे हद्दीत सकाळी-सायंकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या महिला या सोनसाखळी चोरट्यांच्या रडारवर असतात़ धूम स्टाइलने दुचाकीवर येऊन पाठीमागून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचायचे तर कधी पत्ता विचारण्याचा बहाणा अशा या क्लृप्त्या या चोरट्यांकडून वापरल्या जातात़ विशेष म्हणजे काम फत्ते झाल्यानंतर चोरटे क्षणार्धात पलायन करतात अन् पोलिसांच्या नाकाबंदीतही ते हाती लागत नाहीत़ सद्यस्थितीत लग्नसराईचे दिवस असल्याने तसेच मुलांना सुटी असल्याने महिला खरेदीसाठी बाहेर पडतात़ दुचाकीवरून येऊन रस्त्यावरून जाणाऱ्या महिला वा वृद्धांच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा सोनसाखळी चोरटे खेचून नेतात़ सोनसाखळी खेचल्यानंतर चोरट्यांना पळ काढण्यात यश येत असल्याने पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येते़ शहरात सोनसाखळीची घटना घडत नाही, असा एखादाच दिवस जातो़ विशेष म्हणजे या सोनसाखळी चोरट्यांना आवर घालण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते़  सोनसाखळी चोरीतील कमी धोका, कमी श्रम, गुन्हे करण्यास सोपे, पकडले जाण्याची शक्यता कमी, चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणे सोपे. यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली असून, या घटनांमध्येही वाढ झाली आहे़ एक दुचाकी (शक्यतो चोरीची) अन् चालविण्यासाठी साथीदार, एवढेच भांडवल यासाठी पुरेसे असते. तसेच चोरलेले दागिने ठरलेल्या सराफाच्या दुकानात विक्री केले जातात, तर कमी भावात मिळणारे हे सोने सराफ ांकडून विकत घेतले जात असल्याने सहज पैसे मिळतात़ सराफाने सोने वितळून त्याची चीप बनविली की पुरावा संपला, असे या चोरट्यांना वाटते. शहर पोलीस आयुक्तालयात २०१४ पासून सोनसाखळी चोरीच्या घटनांची उकल करण्याचे प्रमाण अत्यल्प कमी आहे़ पोलिसांनी जनजागृतीबरोबरच चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे़

Web Title: Police machinery fail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.