पोलिसांनी दिले कबुतराला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST2021-04-30T04:19:02+5:302021-04-30T04:19:02+5:30

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने वडाळा गाव गॅस गोडाऊन लगत कलानगर चौक आणि पाथर्डी फाटा या ठिकाणी नाकाबंदी करत विनाकारण ...

The police gave life to the pigeon | पोलिसांनी दिले कबुतराला जीवदान

पोलिसांनी दिले कबुतराला जीवदान

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वतीने वडाळा गाव गॅस गोडाऊन लगत कलानगर चौक आणि पाथर्डी फाटा या ठिकाणी नाकाबंदी करत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहनचालकांची तपासणी केली जात आहे. गुरुवारी (दि२९) रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कलानगर चौकात पोलीस कर्मचारी विवेकानंद पाठक व सीताराम मोरे, सविता शिंदे हे नेहमीप्रमाणे पॉइंटवर हजर झाले असता त्यांना एका वाहनचालकाने रस्त्यावर कबुतर कोसळून तडफडल्याचे पोलीस कर्मचारी पाठक यांना सांगितले तातडीने तिघेही कर्मचारी त्वरित धावले.

त्या ठिकाणी जाऊन पाठक यांनी कबुतराला उचलून तंबूमध्ये आणले. पंखात अडकलेला मांजा काढत पाण्याने पंख धुतले. त्यावर हळद पावडर टाकली. थोड्या वेळाने पाणी पाजले. त्यामुळे कबुतराचा जीव वाचला पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण असतानासुद्धा जीव कोणताही असो, तो वाचविणे महत्त्वाचे आहे हे मानून या पोलीस कर्मचाऱ्यांनी एक मुक्या पक्ष्याला जीवदान दिले. त्यांच्या भूतदयेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: The police gave life to the pigeon