चांदवडला आदिवासी कुटुंबीयांना पोलिसांतर्फे अन्नधान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 22:51 IST2020-04-03T22:51:26+5:302020-04-03T22:51:49+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी काळात उपासमार होऊ नये यासाठी चांदवड पोलिसांच्या वतीने शहरातील आदिवासी वस्तीतील ४० मजूर कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

चांदवड पोलीस स्टेशन आवारात आदिवासी मजूर वर्गाला धान्याचे वाटप करताना मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे. समवेत पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील.
चांदवड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी काळात उपासमार होऊ नये यासाठी चांदवड पोलिसांच्या वतीने शहरातील आदिवासी वस्तीतील ४० मजूर कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. अन्नधान्य वाटपप्रसंगी मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, चांदवडचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, उपनिरीक्षक विशाल सणस, गजानन राठोड व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, येथील रेणुकामाता मंदिराजवळ ३० मार्च रोजी झालेल्या अपघातात बाळू ऊर्फ बाळकिसन माधव गांगुर्डे (३५, रा. वासुबन मळा, चांदवड) हे मयत झाले. त्यांच्या कुटुंबाला चांदवडचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील व उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या हस्ते आर्थिक मदत व जीवनाश्यक वस्तू भेट दिल्या.