दारणा धरणाशी असलेल्या हातभट्ट्या पोलिसांकडून उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 22:53 IST2020-04-20T22:52:54+5:302020-04-20T22:53:20+5:30
लॉकडाउन काळात दारूविक्री बंद असताना इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन दारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णानगर कातोरेवाडी येथे सुरू असलेला बेकायदा गावठी दारूचा अड्डा पोलीसपाटील मनोहर जाधव व ग्रामस्थांच्या मदतीने वाडीवºहे पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे.

दारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णानगर कातोरेवाडी येथील बेकायदा दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करताना ग्रामस्थ.
नांदूरवैद्य : लॉकडाउन काळात दारूविक्री बंद असताना इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन दारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णानगर कातोरेवाडी येथे सुरू असलेला बेकायदा गावठी दारूचा अड्डा पोलीसपाटील मनोहर जाधव व ग्रामस्थांच्या मदतीने वाडीवºहे पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे.
लॉकडाउन काळात मद्यपींचे मोठे हाल होत आहे. त्यामुळे शहरातील अनेकांनी देशी दारूकडे आपला मोर्चा वळवला आहे. येथे सुरू असलेल्या दारूभट्ट्या ग्रामस्थांनी नेस्तनाबूत केल्या.
वाडीवºहे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली. या छाप्यात गावठी दारू बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांची चाहूल लागताच दारू विक्री करणारे पळून गेले. बेकायदा गावठी दारूची भट्टी चालविणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत. बीट अंमलदार वाजे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने भट्टी उद्ध्वस्त केली.
इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगर कातोरेवाडी या दारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात बेकायदा गावठी दारू तयार करण्याचा अड्डा असल्याची गुप्त माहिती वाडीवºहे पोलिसांना मिळाली. याबाबत पोलिसांनी येथील पोलीसपाटील मनोहर जाधव व काही ग्रामस्थांची मदत घेऊन नदीच्या पार असलेल्या अड्ड्यावर छापा मारला.