शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
2
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
3
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
4
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
5
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
6
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
7
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
8
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
9
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
10
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
11
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
12
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
13
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
14
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
15
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
16
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
17
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
18
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
19
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
20
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"

पोलिसांचे विभाग स्थलांतरित ; न्यायालयास जागेचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:04 AM

मुंबई उच्च न्यायालयाने शहर पोलीस प्रशासनाच्या अखत्यारितील अडीच एकर जागा जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी देण्याचे आदेश दिले होते़ मात्र, या ठिकाणी पोलिसांचे विविध विभाग कार्यरत असल्याने आदेशानंतरही ताबा मिळालेला नव्हता़ पोलीस प्रशासनाने या जागेवरील सर्व विभाग इतरत्र स्थलांतरित केले असून, सोमवारी (दि़२९) या संपूर्ण जागेचा ताबा जिल्हा न्यायालयात मिळाला आहे़

नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाने शहर पोलीस प्रशासनाच्या अखत्यारितील अडीच एकर जागा जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी देण्याचे आदेश दिले होते़ मात्र, या ठिकाणी पोलिसांचे विविध विभाग कार्यरत असल्याने आदेशानंतरही ताबा मिळालेला नव्हता़ पोलीस प्रशासनाने या जागेवरील सर्व विभाग इतरत्र स्थलांतरित केले असून, सोमवारी (दि़२९) या संपूर्ण जागेचा ताबा जिल्हा न्यायालयात मिळाला आहे़  जिल्हा न्यायालयात दाखल होणाºया खटल्यांच्या संख्येमुळे पक्षकार तसेच वकिलांची गर्दी, त्यातच न्यायालये व पार्किंग अपुरी जागा यामुळे दिवसेंदिवस न्यायालयातील समस्यांमध्ये वाढ होत चालली होती़ जिल्हा न्यायालयाचे विस्तारीकरणासाठी पोलीस विभागाच्या अखत्यारितील पाच एकर जागा मिळावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली होती़ या याचिकेवर सुनावणी होऊन सद्य:स्थितीत अडीच एकर जागा जिल्हा न्यायालयाचे आदेश देण्यात आले होते़  मात्र, या जागेवर पोलिसांचे मोटर परिवहन विभागासह इतरही कार्यालये असल्याने प्रत्यक्ष जागेचा ताबा मिळालेला नव्हता़ यानंतर उच्च न्यायायलाने तीच जानेवारीपर्यंत जागेचा प्रत्यक्ष ताबा देण्याचे आदेश दिल्याने या ठिकाणची कार्यालये इतरत्र स्थलांतरित करण्यात आली असून, सोमवारी या जागेचा ताबा देण्यात आला़ यावेळी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ नितीन ठाकरे, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड़ जयंत जायभावे, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर, अ‍ॅड़ आर. टी. जगताप, उपाध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश आहुजा, सचिव अ‍ॅड़ जालिंदर ताडगे, सहसचिव अ‍ॅड़ शरद गायधी आदी उपस्थित होते. याप्रसंगी न्यायालयाचा विस्तार लवकरात लवकर करून न्यायालयीन इमारतीचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी नाशिक बार असोसिएशनतर्फे करण्यात आली.  पोलीस खात्याला या जागेवरील त्यांचे बॅरेक आणि कार्यालय स्थलांतर करण्याबाबतचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पोलीस खात्याने आपली कार्यालये हलविण्यास प्रारंभ केला होता. गेल्या दोन दिवसांपासून जागा मोकळी करून देण्याबाबत पोलीस खात्याकडून प्रयत्न सुरू होते. सुमारे अडीच एकर जागा जिल्हा न्यायालयाला मिळाल्यामुळे न्यायालयाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलीस खाते आणि न्यायालय यांच्यातील जागेवरून अनेक दिवसांपासून दावे-प्रतिदावे केले जात होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय