बरू यास २७ पर्यंत पोलीस कोठडी
By Admin | Updated: May 24, 2014 00:56 IST2014-05-23T23:47:03+5:302014-05-24T00:56:54+5:30
नाशिक : समीर हांडे खून प्रकरणातील संशयित किशोर बरू यास आज न्यायालयासमोर उभे केले असता त्यास येत्या २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासून फरारी असलेला बरू हा काल पोलिसांना शरण आला होता.

बरू यास २७ पर्यंत पोलीस कोठडी
नाशिक : समीर हांडे खून प्रकरणातील संशयित किशोर बरू यास आज न्यायालयासमोर उभे केले असता त्यास येत्या २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासून फरारी असलेला बरू हा काल पोलिसांना शरण आला होता.
मखमलाबाद नाक्यावरील कोठारवाडी परिसरात राहणार्या प्रवीण ऊर्फ समीर हांडे या युवकाच्या हत्त्या प्रकरणात तीन महिन्यांपासून बरू फरारी होता. यापूर्वी पोलिसांनी सर्व सहा संशयितांना अटक केली आहे.
तीन महिन्यांपूर्वी समीर हांडे याची तोंडावर गोळी झाडून हत्त्या करण्यात आली होती. या प्रकरणी तुकाराम चोथवे, नीलेश नेरूकर, अमोल चांगले, प्रवीण कुमावत, पप्पू खैैरे व किशोर बरू अशा सहा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांना यापूर्वीच ताब्यात घेतले होते. बरू हा काल पंचवटी पोलिसांना शरण आला होता.
आज न्यायालयासमोर उभे केले असता त्यास येत्या २७ पर्यंत कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, बरू याची भीम पगारे हत्त्या प्रकरण तसेच दरोड्याच्या तयारीत असल्या प्रकरणीही चौकशी होणार असल्याचे समजते.
(वार्ताहर)