गावठी कट्टा बाळगणाऱ्याला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 16:03 IST2020-03-10T16:03:38+5:302020-03-10T16:03:56+5:30
मालेगाव मध्य : शहरातील सोनिया कॉलनी येथे मंगळवारी मध्य रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हारुण खान अय्युब खान यास अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा व पाच जीवंत काडतुस हस्तगत करण्यात आले.

गावठी कट्टा बाळगणाऱ्याला पोलीस कोठडी
मालेगाव मध्य : शहरातील सोनिया कॉलनी येथे मंगळवारी मध्य रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हारुण खान अय्युब खान यास अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा व पाच जीवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीषक संदीप दुनगहू यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आयेशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनिया गांधी कॉलनीच्या कोपºयालगत हारुण खान अय्युब खान रा. सोनिया गांधी कॉलनी यास ताब्यात घेत त्यांची झडतीत एक गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे मिळून आले. त्याला मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरूवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सदर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, पोलीस हवालदार वसंत महाले, पोलीस शिपाई फिरोज पठाण, चेतन संवत्सरकर आदिंचा समावेश होता. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गिरी करीत आहेत.