शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

५ हजाराची लाच स्विकारताना पोलीस हवालदार जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 9:11 PM

संशयित लाचखोर मल्ले हे गळाला लागल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या वर्तुळात त्यांचे विविधप्रकारचे ‘किस्से’ चर्चिले जात होते.

ठळक मुद्देशिताफीने मल्ले यास रंगेहात ताब्यात घेतले

नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंगारमालाचे दुकान सुरू करण्यासाठी तक्रारदार व्यावसायिकाकडे पाच हजारांची मागणी करत लाचेची तेवढी रक्कम स्वीकारताना या पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात कार्यरत असलेले संशयित हवालदार भास्कर दामोदर मल्ले (५२) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून गुरुवारी (दि.१०) अटक केली.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी, एका ३२ वर्षीय भंगार व्यावसायिकाला पोलीस ठाणे हद्दीत दुकान सुरू ठेवण्यासाठी मल्ले याने तक्रारदार व्यापाऱ्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. बोलणी झाल्यानुसार गुरुवारी मल्ले याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे उपअधीक्षक सुनील पाटील, सहायक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक किरण रासकर, राजेंद्र गिते, शरद हेंबाडे आदींनी शिताफीने मल्ले यास रंगेहात ताब्यात घेतले. मल्लेविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याप्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत आहेत. संशयित लाचखोर मल्ले हे गळाला लागल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या वर्तुळात त्यांचे विविधप्रकारचे ‘किस्से’ चर्चिले जात होते. गुरुवारी ते रजेवर असताना लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी गेले होते. पोलीस ठाण्यांमध्ये चालणारे चिरीमिरीचे गुपचूप व्यवहार सर्वश्रुत आहे; मात्र आयुक्तालय हद्दीत पोलीस दलाची प्रतिमा अधिकाधिक सुधारण्यासाठी व कारभार पारदर्शक करण्याकरिता नवनियुक्त आयुक्त दीपक पाण्डेय यांना अधिक लक्ष द्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयBribe Caseलाच प्रकरण