पोलीस आयुक्तांनी केले शस्त्रपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 01:01 IST2017-10-01T01:00:59+5:302017-10-01T01:01:04+5:30

विजयादशमीनिमित्त पोलीस मुख्यालयातील शस्त्रागारात पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल व त्यांच्या पत्नी राज्याच्या महिला बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांच्या हस्ते विधिवत शस्त्रपूजन करण्यात आले़ यावेळी शस्त्रागारातील कर्मचाºयांचा सिंगल यांनी सत्कार केला़

 Police Commissioner's Arms Pooja | पोलीस आयुक्तांनी केले शस्त्रपूजन

पोलीस आयुक्तांनी केले शस्त्रपूजन

नाशिक : विजयादशमीनिमित्त पोलीस मुख्यालयातील शस्त्रागारात पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल व त्यांच्या पत्नी राज्याच्या महिला बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांच्या हस्ते विधिवत शस्त्रपूजन करण्यात आले़ यावेळी शस्त्रागारातील कर्मचाºयांचा सिंगल यांनी सत्कार केला़  पोलीस दलाकडे पांरपरिक बंदुकांबरोबरच आता नवीन शस्त्रास्त्रेही आहेत़ या शस्त्रास्त्रांच्या सर्व्हिसिंगसाठी एक स्वतंत्र विभाग कार्यरत आहे़ पोलीस मुख्यालयातील या बंदुकांची सिंगल यांनी सत्पनीक विधीवत पूजा केली़ यावेळी अत्याधुनिक बंदुकांना फुलांनी सजविण्यात आले होते़ यावेळी उपायुक्त विजय मगर, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे आदींसह वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. पोलीस मुख्यालयाबरोबरच शहरातील तेराही पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली़

Web Title:  Police Commissioner's Arms Pooja