येवल्यात पोलीस ‘अ‍ॅक्शन मोडवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 10:47 PM2020-04-01T22:47:50+5:302020-04-01T22:48:18+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाउन व संचारबंदी लागू असतानाही आदेशाची पायमल्ली करत दुचाकी वाहन घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहर पोलीस बुधवारी (दि.१) ‘अ‍ॅक्शन मोड’वर होते.

Police arrive in 'Action Mode' | येवल्यात पोलीस ‘अ‍ॅक्शन मोडवर’

येवला शहरातील विंचूर चौफुलीवर दुचाकी चालकावर कारवाई करताना पोलीस कर्मचारी.

Next
ठळक मुद्देकारवाई : अनेक ठिकाणी रस्ते ब्लॉक

येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाउन व संचारबंदी लागू असतानाही आदेशाची पायमल्ली करत दुचाकी वाहन घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहर पोलीस बुधवारी (दि.१) ‘अ‍ॅक्शन मोड’वर होते.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गर्दी व संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू केली असली तरी नागरिक घराबाहेर पडायचे थांबतच नाही. यावर शहरात नगरपालिका व पोलीस प्रशासनाने ‘ब्लॉकडाउन’चा उपाय केला. यात शहरातील सर्वच गल्ली-बोळा, चौक, वसाहती लोखंडी पाईप, बल्ल्या, बांबू काही ठिकाणी तर झाडांच्या फांद्या टाकून रस्ते ब्लॉक केले आहेत. या भागातील नागरिक त्या भागात जाऊ नये, मुख्य रस्त्यांवर वा इतरत्र फिरू नये, वाहन रोडवर येऊ नये या हेतूने प्रशासनाने ही उपाययोजना केली; मात्र तरीही काही तरूण व नागरिक वाहनांसह रस्त्यांवर यायचे थांबेना. भाजीपाला, किराणा, बँक, दवाखाने अशा कारणांखाली गावात पायमोकळे करत फिरण्याबरोबरच वाहन घेऊन चक्कर मारायचे सुरूच राहिले.
मंगळवारी आठवडे बाजार बंद असला तरी शनिपटांगण येथे मिनी आठवडे बाजारच भरला होता. या बाजारात मोठी गर्दीही दिसून आली होती. सप्तश्रृंगी मंदिराजवळ लाकडी बल्ल्या लावून बंद केलेला रस्ता काही महाभागांनी खुला करून घेतला होता. एक बल्ली खुली करून तिच्यावरून वाहन येत जात होती.
बुधवारी सकाळपासूनच शहर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर दिसून आले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण आणि सहकाऱ्यांनी विंचूर चौफुलीवर महामार्गावर फिरणाºया दुचाकींना अडवत विनाकारण फरणाºयांवर कारवाई करण्याची मोहीमच उघडली होती. दिवसभरात सुमारे १० दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली.

Web Title: Police arrive in 'Action Mode'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.