फरार संशयितांना पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:16 IST2021-05-21T04:16:17+5:302021-05-21T04:16:17+5:30
याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश अबिका विश्वकर्मा ( 50 रा. इच्छामणी प्राईड,कामटवाडे ) हे त्यांच्या कारने (एम एच ...

फरार संशयितांना पोलिसांनी केली अटक
याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश अबिका विश्वकर्मा ( 50 रा. इच्छामणी प्राईड,कामटवाडे ) हे त्यांच्या कारने (एम एच 15 जी ए 4090 ) अंबड औद्योगिक वसाहतीतून जात असताना संशयित सीमा भागवत आहिरे व शीतल कटारे यांनी त्यांच्या गाडीत कट का मारला ? असे सांगत शिवीगाळ करत यातील सीमा हिने दिनेश यांच्या डोक्यात व हातावर रोड मारला तर शीतलने दगडाने त्यांच्या गाडीची काच फोडली तसेच भागवत आहिरे व राहुल पानपाटील यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत दिनेश हे गंभीर जखमी झाले होते ही घटना 14 फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्या वेळेपासून संशयित हे फरार होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते मात्र ते मिळून येत नव्हते अशातच पोलिसांना ते सिडकोत्त एका ठिकाणी येत असल्याचे खबऱ्या मार्फत समजले. यावरून पोलिसांनी सापळा रचत सीमा अहिरे, शितल कटारे, राहुल पानपाटील यांना शिताफीने अटक केली तर भागवत आहिरे हा अद्याप पर्यंत फरार आहे .संशयितांना पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक शांताराम शेळके, महेंद्र आंबेकर करीत आहेत