मेशीत एकाच कुटुंबातील सात मुलांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:49+5:302021-06-26T04:11:49+5:30
मेशी : देवळा तालुक्यातील मेशी येथील प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ भिला चव्हाण यांचे एकत्र कुटुंबातील सात मुलांना शुक्रवारी ...

मेशीत एकाच कुटुंबातील सात मुलांना विषबाधा
मेशी : देवळा तालुक्यातील मेशी येथील प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ भिला चव्हाण यांचे एकत्र कुटुंबातील सात मुलांना शुक्रवारी (दि.२५) जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली. या मुलांवर देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रात्रीच्या वेळी जेवणानंतर या मुलांना त्रास जाणवू लागला असता त्यांना मेशी येथील खाजगी दवाखान्यात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी मुलांना विषबाधा झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांना देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या मुलांची प्रकृती स्थिर आहे. चव्हाण यांच्या कुटुंबातील प्रेरणा संतोष चव्हाण (वय १६), श्रुती संतोष चव्हाण (वय १४), मनोज संतोष चव्हाण (वय १२), गौरी एकनाथ चव्हाण (वय १३), जयेश एकनाथ चव्हाण (वय १०), करण तुकाराम चव्हाण (वय १०) व रितिका तुकाराम चव्हाण (वय ६) यांना जेवणातून विषबाधा झाली. विषबाधा कशामुळे झाली, याची माहिती अद्याप मिळाली नाही. वैद्यकीय अधिकारी मुलांवर उपचार करत असून त्यांच्यात सुधारणा होत आहे.