पेठ तालुक्यात इंटरनेट सेवेचा बोजवारा
By Admin | Updated: June 5, 2014 02:06 IST2014-06-05T01:28:12+5:302014-06-05T02:06:26+5:30
पेठ तालुक्यात इंटरनेट सेवेचा बोजवारा

पेठ तालुक्यात इंटरनेट सेवेचा बोजवारा
पेठ : शहरासह तालुक्यातील भारतीय संचार निगमची सेवा खंडित होऊन इंटरनेट सुविधा बंद पडल्याने विविध बँकांचे व्यवहार ठप्प झाले असून, यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ पावसाळा तोंडावर आल्यावर दरवर्षी या भागात वीज व टेलिफोन लाइनचा बोजवारा उडत असतो़ गंजलेल्या केबल्स व तुटलेल्या तारा यामुळे थोडा जरी पाऊस अथवा वादळ झाले तरीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने टेलिफोन सुविधाही खंडित होत असल्याने आॅनलाइन कामे बंद पडतात़ पेठ येथे महाराष्ट्र बँक, स्टेट बँक, जिल्हा बँक, तहसील कार्यालय, पंचायत समिती आदि शासकीय कार्यालयात बहुतांश कामे आॅनलाइन होत असल्याने खंडित सेवेमुळे व्यवहार बंद पडले आहेत़ बँकांमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, दिवसातून चार-पाच तास सेवा खंडित होत असल्याने येथील कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे़ यामुळे पैसे असूनही ग्राहकांना हातात मिळत नाही तर खंडित सेवेमुळे कर्मचारीही वैतागले आहेत़ पावसाळा तोंडावर आल्याने या पुढील काळात या समस्यांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता वीज मंडळ व बीएसएनएलने तत्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे़ (वार्ताहर)