शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

काव्यातून उमटले समाजव्यवस्थेवर भाष्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:28 IST

‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता, माणसाच्या अंतरंगाला घालतो साद आता’, ‘विद्रोह शिव्या नसतो, विद्रोह असतो तुकारामांच्या ओव्या’, ‘बाप जेवायचा, पण अर्धीच भूक राखून’ या आणि अशा विद्रोही कवितांचे सादरीकरण रविवारी (दि. २९) ‘देश आमचा देव नाही देह आहे’ या वैचारिक वादळी कविसंमेलनात करण्यात आले.

नाशिक : ‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता, माणसाच्या अंतरंगाला घालतो साद आता’, ‘विद्रोह शिव्या नसतो, विद्रोह असतो तुकारामांच्या ओव्या’, ‘बाप जेवायचा, पण अर्धीच भूक राखून’ या आणि अशा विद्रोही कवितांचे सादरीकरण रविवारी (दि. २९) ‘देश आमचा देव नाही देह आहे’ या वैचारिक वादळी कविसंमेलनात करण्यात आले.  परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कवी संमेलनात माणूस हा के ंद्रबिंदू मानून आजच्या समाज व्यवस्थेवर भाष्य करणाºया अनेकविध विद्रोही कवितांचे सादरीकरण करण्यात आले. पुणे येथील कवी रवींद्र कांबळे यांनी सुरुवातीला ‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता’ ही कविता सादर करत आपल्या सभोवताली वेळोवेळी घडणाºया वादांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दीप पारधे (ठाणे) यांनी ‘चौकातला देव’ या कवितेतून अंधश्रद्धा तसेच पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांच्या झालेल्या हत्या याबाबत कवितेतून टीका केली.  उत्तरोत्तर हे काव्यसंमेलन रंगत असताना सोलापूर येथील कवी अंकुश आरेकर याने आपल्या कवितेतून आजची शिक्षण व्यवस्था कशी तकलादू आहे याचे दर्शन घडविले, तर सांगली येथील कवी नितीन चंदनशिवे यांनी आपल्या कवितेतून नास्तिकता, शेतकरी आत्महत्या, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे देशवासीयांचे झालेले नुकसान याबाबत भाष्य केले. नाशिक येथील कवी भीमराव कोते पाटील यांनी ‘माणसांच्या कविता’ या कवितेतून पुरोगामी, मूलतत्त्ववादी विचारसरणी अनुसरणाºया समाजातील घटकांवर मार्मिक भाष्य केले.‘देश आमचा देव नाही देह आहे’ या काव्यसंमेलनाचा नाशिक येथे सातव्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या या कविसंमेलनात जागतिक घडामोडी समोर ठेवून, देश, देशातील प्रत्येक नागरिक, भयमुक्त, रोगमुक्त, निर्भयपणे जगावा यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आकाश सोनवणे यांनी दिली. या कविसंमेलनास काव्य रसिकांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती.अनेक कवींचा सहभागकवी आकाश सोनवने यांच्या संकल्पेनेतून साकारलेल्या या काव्यसंमेलनात अंकुश आरेकर (सोलापूर), भीमराव कोते पाटील (नाशिक), राजेंद्र राठोड (पनवेल), सागर काकडे (सातारा), रवींद्र कांबळे (पुणे), नितीन चंदनशिवे (सांगली), जित्या जाली (पुरंदर), दीप पारधे (ठाणे), सुमित गुणवंत (शिरूर), हृदयमानव अशोक (अहमदनगर), गुरुनाथ साठेलकर (खोपोली) यांनी सहभाग नोंदवला.