सौंदर्य स्पर्धेत कविता देवरे ‘मिसेस महाराष्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:18 IST2019-09-14T22:12:56+5:302019-09-15T00:18:06+5:30

ग्लोरिअस गु्रपच्या वतीने घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत डॉ. कविता देवरे ‘मिसेस महाराष्टÑ’, तर हर्षा बाफना ‘मिस महाराष्टÑ’ विनर ठरल्या आहेत. मराठी अभिनेत्री वृषाली हटाळकर यांच्या हस्ते स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.

Poetess Devere 'Mrs Maharasht' in beauty contest | सौंदर्य स्पर्धेत कविता देवरे ‘मिसेस महाराष्ट’

सौंदर्य स्पर्धेतील विजेती कविता देवरे. समवेत शारदा टिळे, अभिनेत्री वृषाली हटाळकर, ज्योती पाटील, प्रिया मुनशेट्टीवार आदी

नाशिक : ग्लोरिअस गु्रपच्या वतीने घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत डॉ. कविता देवरे ‘मिसेस महाराष्टÑ’, तर हर्षा बाफना ‘मिस महाराष्टÑ’ विनर ठरल्या आहेत. मराठी अभिनेत्री वृषाली हटाळकर यांच्या हस्ते स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती पाटील कटाळे, प्रिया मुनशेट्टीवार होत्या. परीक्षक म्हणून साक्षी खैरनार, संदेशा पाटील यांनी काम पाहिले. ग्लोरिअस ग्रुपचे आयोजन शारदा टिळे पाटील यांनी केले होते. यावेळी मिसेस रनर अप म्हणून स्वाती ठाकूर व अंजली देशपांडे तर मिसमध्ये सुप्रिया ढबळे व मिताली कोकाटे ठरल्या. किड््समध्ये रूई देशमुख, मल्हार हांडे, श्रावणी भालेराव, श्रिया लोखंडे, अर्जव क्षत्रिय, पूर्वा कटाळे, शिवम आहुजा, आर्या धर्माधिकारी, भूमिका अहिरे, स्माही ढिकले विजयी झाल्या.

Web Title: Poetess Devere 'Mrs Maharasht' in beauty contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.