भूखंड रेल्वेचा; मोबदला अदा केला महापालिकेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:34+5:302021-03-13T04:26:34+5:30

नाशिक महापालिकेने अशाप्रकारचा मोबदला अदा करण्यापूर्वी रेल्वे प्राधिकरणाकडून ७५ टक्के मोबदल्याची रक्कम महापालिकेला जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. ...

Plot railway; The compensation was paid by the Municipal Corporation | भूखंड रेल्वेचा; मोबदला अदा केला महापालिकेने

भूखंड रेल्वेचा; मोबदला अदा केला महापालिकेने

नाशिक महापालिकेने अशाप्रकारचा मोबदला अदा करण्यापूर्वी रेल्वे प्राधिकरणाकडून ७५ टक्के मोबदल्याची रक्कम महापालिकेला जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, हा मोबदला अदा होण्याच्या आतच महापालिकेने जागामालकाला टीडीआर दिला असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आणि कोट्यवधी रुपयांचा टीडीआर चुकीच्या पद्धतीने देण्यात आला, असेही लेखीपत्र बडगुजर यांनी दिले आहे.

नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीवर नऊ भूसंपादनाची प्रकरणे आक्षेपार्ह असल्याने त्यासंदर्भात बडगुजर यांनी आक्षेप घेतल्यानंतर चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. १०) झालेल्या या चौकशी समितीच्या बैठकीत बडगुजर यांना तक्रारकर्ता म्हणून पाचारण करण्यात आले होते. त्या आधारे त्यांनी हे निवेदन दिले. देवळाली येथील सर्व्हे नंबर २४६/१, २४६/२, २४६/३ या तीन सर्व्हे क्रमांकांमध्ये रेल्वे टर्मिनल आणि अलाइड सर्व्हिससाठी आरक्षण क्रमांक २२२ ए क्षेत्र ६० हजार चौ.मी.पैकी ५० हजार ६२४ क्षेत्रफळावर टीडीआर देण्यात आला आहे. या प्रकरणात भूसंपादन प्राधिकरण रेल्वे असतानाही २०११-१२ या वर्षामध्ये मनपाने रेल्वेकडून कोणताही मोबदला न घेता परस्पर भूसंपादन प्रक्रिया सुरू करून बेकायदेशीरीत्या टीडीआर अदा केला. शासनाच्या २८ जुलै २००९च्या आदेशात भूसंपादन करताना रेल्वे हेच भूसंपादन प्राधिकरण असले तरी महापालिकेेने टीडीआर देण्यास हरकत नाही; मात्र रेल्वेने कमीत कमी ७५ टक्के रक्कम मनपाला अदा करावी त्यानंतरच जागामालकाला टीडीआर अदा करता येईल, अशी अट घालण्यात आली हाेती. मात्र त्याचा भंग करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.

इन्फो....

महापालिकेने सन २०११-१२ मध्ये रेल्वे प्राधिकरणाऐवजी स्वत:च आरक्षित भूखंडाचे भूसंपादन केेले आणि त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ७५ टक्के मोबदलाही आला नाही. या प्रकरणात महापालिकेचे १६ काेटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आराेप सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

Web Title: Plot railway; The compensation was paid by the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.