प्लॅस्टिक पिशव्या जप्त
By Admin | Updated: July 5, 2017 01:10 IST2017-07-05T01:09:59+5:302017-07-05T01:10:12+5:30
नाशिकरोड : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या ३८ किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आला.

प्लॅस्टिक पिशव्या जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : जेलरोड परिसरातून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या ३८ किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या दुकानदार व विक्रेत्यांकडून जप्त करत त्यांच्याकडून ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी सुनील बुकाने, विभागीय मनपा अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेलरोड भागातील काही दुकानांतून व रस्त्यावरील विक्रेत्यांकडे असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांची तपासणी केली. पर्यावरणाला हानीकारक असलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या ३८ किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करत संबंधित दुकानदार व विक्रेत्यांकडून ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमध्ये विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, राजू, निरभवणे, अजय मोरे, विजय जाधव, एकनाथ ताठे, प्रभाकर थोरात, ज्ञानेश्वर भोसले, जनार्दन घंटे, रोशन दिवे, अमोल हिरे, संजय काळे, गायकवाड आदी सहभागी झाले होते.