जळगाव नेऊर : कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सर्वच रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत असून रक्त व प्लाझ्मासाठी रुग्णांना वणवण भटकाव लागत आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातुन रक्तदान व प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दुर्गसेवकांनी शिवरायांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत प्लाझ्मा व रक्तदान करुन शिवरायांना आदराजंली वाहिली.स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवार "संवेदना" नावाने हा उपक्रम राबवत आहे. संवेदना उपक्रमाअंतर्गत अनेक रुग्णांना प्लाझ्मा तसेच बेड ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मंगळवारी (दि.२७) नाशिकच्या शुभम मेधने याने शिवरायांनी शिकवण असलेला माणुसकीचा धर्म पाळत एका मुस्लिम भगिनीला प्लाझ्मा दान करत वेगळा आदर्श निर्माण केला. उपक्रमात येवला तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील सदस्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रविण भंडारे, विशाल जाधव, संदिप बर्शिले, प्रथमेश दारुणकर, गोरख कोटमे, ॠत्विक गोरे तसेच राजमुद्रा सोशल फाऊंडेशन, स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवार व संवेदना च्या सदस्यांनी सहभाग नोंदवला.
प्लाझ्मा, रक्तदान करत शिवरायांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 19:41 IST
जळगाव नेऊर : कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सर्वच रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत असून रक्त व प्लाझ्मासाठी रुग्णांना वणवण भटकाव लागत आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातुन रक्तदान व प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दुर्गसेवकांनी शिवरायांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत प्लाझ्मा व रक्तदान करुन शिवरायांना आदराजंली वाहिली.
प्लाझ्मा, रक्तदान करत शिवरायांना आदरांजली
ठळक मुद्देस्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराचा उपक्रम