सातपूर : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर लक्ष वेधण्यासाठी या खड्ड्यात वृक्षारोपण करून सातपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. परिसरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित न बुजविल्यास सर्वच प्रभागात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले. सातपूर विभागात पाच प्रभाग असून, असा एकही प्रभाग असा नाही की, तेथे खड्डे नाहीत. महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी पक्ष सातपूर विभागाच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात सातपूर शहर अध्यक्ष जीवन रायते, मधुकर मौले, समाधान तिवडे, दत्ताजी वामन, नीलेश भंदुरे, ऋ षिराज खरोटे, अरु ण भोसले, तुषार दिवे, संदीप पवार, महेश आहेर, राहुल बैरागी, धनंजय रहाणे, जीवन बेंडकुळे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सातपूरला खड्ड्यात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 01:09 IST
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर लक्ष वेधण्यासाठी या खड्ड्यात वृक्षारोपण करून सातपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. परिसरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित न बुजविल्यास सर्वच प्रभागात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सातपूरला खड्ड्यात वृक्षारोपण
ठळक मुद्देमनपाविरोधात आंदोलन : राष्ट्रवादी काँग्रेसची गांधीगिरी