वडगाव पिंगळात शंभर वृक्षांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:14 IST2021-09-27T04:14:54+5:302021-09-27T04:14:54+5:30

येथील सामाजिक कार्यकर्ते अजय हुळहुळे यांनी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात विविध औषधी वनस्पतींच्या वृक्षांच्या कलमांची लागवड केली. गावातील प्रत्येक ...

Planting of one hundred trees in Wadgaon Pingala | वडगाव पिंगळात शंभर वृक्षांचे रोपण

वडगाव पिंगळात शंभर वृक्षांचे रोपण

येथील सामाजिक कार्यकर्ते अजय हुळहुळे यांनी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात विविध औषधी वनस्पतींच्या वृक्षांच्या कलमांची लागवड केली. गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात वेळोवेळी ग्रामस्थांना मदत करणाऱ्या हुळहुळे यांनी येत्या काही दिवसांत वडगाव पिंगळा गाव व शिवार विविध झाडांची लागवड करून हिरवेगार करण्याचा संकल्पही त्यांनी केला. शाळेच्या आवारात वृक्षलागवड केल्याने शालेय समितीचे अध्यक्ष संपत विंचू यांनी आभार मानले.

यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर हरळे, पोलीस पाटील सागर मुठाळ, चिंतामण सानप, विजय विंचू, रामभाऊ शिंदे, सुरेश सानप, राजू सानप, आदींसह ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

फोटो- २६ वडगाव पिंगळा

सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अजय हुळहुळे, उपसरपंच ज्ञानेश्वर हरळे, पोलीस पाटील सागर मुठाळ, चिंतामण सानप, विजय विंचू, रामभाऊ शिंदे, सुरेश सानप, राजू सानप, आदी.

260921\26nsk_14_26092021_13.jpg

फोटो- २६ वडगाव पिंगळा 

Web Title: Planting of one hundred trees in Wadgaon Pingala