गुरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 17:38 IST2019-07-19T17:38:22+5:302019-07-19T17:38:48+5:30

सिन्नर : तालुक्यातील गुरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने परिसरात ३५ वृृक्षांची लागवड केली. पाणी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी विविध वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली.

Plantation in Zilla Parishad School of Gurevadi | गुरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

गुरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

सिन्नर : तालुक्यातील गुरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने परिसरात ३५ वृृक्षांची लागवड केली. पाणी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी विविध वृक्षांची रोपे उपलब्ध करून दिली. यात वड, पिंपळ, कडुनिंब, शेवगा, चिंच, जास्वंद व फुलझाडांचा समावेश आहे.
पाणी फाउंडेशनचे दत्ता निकाळजे, गुरेवाडी विकास सोसायटीचे अध्यक्ष शरद सोनवणे, अध्यक्ष सूर्यभान गांडोळे, सुनीता गांडोळे, रामनाथ गांडोळे, बाजीराव जाधव, संजय झोंबाड, सुरेखा जाधव, अनिल गुरव, प्रकाश पिंपळे, सोपान गांडोळे, वर्षा जाधव, विमल माळी, शांताराम गांडोळे, पांडुरंग सोनवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापिका पद्मा भुसा यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरात सोमनाथ मोरे व साईनाथ बर्डे यांनी वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे योगदान दिले.

Web Title: Plantation in Zilla Parishad School of Gurevadi