सप्तशृंगगडावर वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 00:24 IST2021-06-06T23:32:12+5:302021-06-07T00:24:30+5:30
सप्तशृंगगड : भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख यांची बदली झाल्याने, त्यांच्या जागी नवनियुक्त जिल्हा न्यायाधीश व अति सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांनी पदभार स्वीकारला आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते सप्तशृंगगडावर वृक्षारोपण करण्यात आले.

सप्तशृंगगडावर वृक्षारोपण करतांना नवनियुक्त अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश वर्धन पी. देसाई व विश्वस्त मंडळ.
सप्तशृंगगड : भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख यांची बदली झाल्याने, त्यांच्या जागी नवनियुक्त जिल्हा न्यायाधीश व अति सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांनी पदभार स्वीकारला आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते सप्तशृंगगडावर वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त दीपक पाटोदकर, ललित निकम, मंज्योत पाटील, प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकनराव वाबळे, ट्रस्टचे कर्मचारी किरण राजपूत, यशवंत देशमुख, नानाजी काकळीज, प्रकाश जोशी, नरेंद्र महाले, प्रमोद देशमुख आदी कर्मचारी उपस्थित होते.