शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

करंजगाव-मांजरगाव रस्त्यालगत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 19:09 IST

निफाड : कृषी दिनानिमित्त वन विभागाच्या वतीने निफाड तालुक्यातील करंजगाव येथे सोमवारी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सदस्य तथा जी.प. शिवसेना गटनेते बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करंजगाव-मांजरगाव रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले.

ठळक मुद्देवृक्ष दिंडी यशस्वी करण्यासाठी कृषिदूतांनी प्रयत्न केले.

निफाड : कृषी दिनानिमित्त वन विभागाच्या वतीने निफाड तालुक्यातील करंजगाव येथे सोमवारी ३३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सदस्य तथा जी.प. शिवसेना गटनेते बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करंजगाव-मांजरगाव रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले.या योजनेअंतर्गत सुमारे पाच हजार वृक्षलागवड हिवरगाव-म्हाळसाकोरे-गाजरवाडी व करंजगाव-मांजरगाव रस्त्यावर करण्यात येणार आहे. यावेळी निफाडचे वनक्षेत्रपाल संदिप पाटील, पंचायत समिती सदस्य शहाजी राजोळे, करंजगावचे सरपंच राजेंद्र राजोळे, माजी सरपंच खंडू बोडके, नंदू राजोळे, नंदू निरभवणे, सचिन राजोळे, वनपाल अजय शिंदे, शरद चितोडे, भाऊसाहेब माळी, वनरक्षक योगिता काळे-खिरकाडे, अश्विनी सोमवंशी, हर्षवर्धन सोळसे, प्रदीप पवार, शरद दराडे आदी उपस्थित होते.खेडलेझुंगे येथे वृक्षदिंडी सोहळानिफाड : येवला तालुक्यातील बाभूळगाव कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत व तुकाराम बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खेडले झुंगे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीदिनानिमित्त खेडलेंझुगे येथे वृक्षदिंडी काढण्यात आली.वृक्ष लागवड काळाची गरज, वृक्ष संवर्धन, एक मूल एक झाड असा संदेश या वृक्ष दिंडीच्या निमित्ताने देण्यात आला. याप्रसंगी जुन्या व नवीन लावलेल्या झाडाचे केक कापून वाढदिवस देखील साजरे करण्यात आले. यावेळी सरपंच सुषमा गीते, प्राचार्य एस. सी. राहटल, पर्यवेक्षक डी. पी. कडवे, वायकर, क्षीरसागर, विलास निरभवणे, पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब केदारे तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्र माचे आयोजन कृषी महाविद्यालय बाभूळगाव येवला येथील प्रामुख्याने अनिकेत बोरस्ते, अभिजित भड, गौरव थोरात, ऋ षिकेश दरेकर, अक्षय बागल, विवेक भगरे, सुरज तिडके, गोरख कोल्हे, धनंजय निकम या कृषिदूतांनी केले होते त्यांना प्राचार्य डॉ. डी. पी. कूळधर, डॉ. किशोर मुठाळ, प्रा. जयपाल राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.येवला तालुक्यातील बाभूळगाव कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत, जळगांव ग्रामपंचायत व जि. प. प्राथमिक शाळा यांच्यावतीने कृषी दिनानिमित्त तालुक्यातील जळगांव येथे कृषी दिंडी काढण्यात आली होती. याप्रसंगी विनता वडघुले, गणेश वडघुले, ज्ञानेश्वर वडघुले, रमेश वडघुले, अमति वडघुले, जि. प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय डेर्ले, आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसगी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.ही वृक्ष दिंडी यशस्वी करण्यासाठी शुभम भालेराव, श्याम आगळे, अमर लिंगाराव, चंदू मधूमानी, भूषण भालेराव, प्रवीण देवरे, तुषार बोरसे, राहुल देशमुख या कृषिदूतांनी प्रयत्न केले.