जुनी शेमळी ५०० झाडे लावण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 18:29 IST2019-07-11T18:29:16+5:302019-07-11T18:29:47+5:30

सटाणा नगरपालिकेचे नगरसेवक तसेच स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल (बाबा) पाटील यांची जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नवी शेमळी येथील माजी सरपंच सचिन दगाजी वाघ व जुनी शेमळीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश बाळासाहेब बागुल, संदीप वाघ यांच्या हस्ते रोप भेट देण्यात आले.

Plantation of 500 trees | जुनी शेमळी ५०० झाडे लावण्याचा संकल्प

जुनी शेमळी येथे राहुल पाटील यांना रोपांची भेट देताना सचिन वाघ, गणेश बागुल, संदीप वाघ, श्याम बगडाने.

जुनी शेमळी : सटाणा नगरपालिकेचे नगरसेवक तसेच स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल (बाबा) पाटील यांची जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नवी शेमळी येथील माजी सरपंच सचिन दगाजी वाघ व जुनी शेमळीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश बाळासाहेब बागुल, संदीप वाघ यांच्या हस्ते रोप भेट देण्यात आले.
प्रत्येक वेळी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले जातात. परंतु या दोन तरु ण युवकांनी एक आदर्श अशी संकल्पना आचरणात आणून झाडांची संकल्पना सुरू केली आहे. ज्या व्यक्तींचे वाढदिवस असतात किंवा ज्या मित्रांना मुलगी जन्माला येते अशा सर्वांना ते झाड भेट देत आहेत. झाडे लावा झाडे जगवा, असा त्यांच्या मोहिमेचा उद्देश आहे.
पर्यावरण दिनापासून सुरू केलेल्या या मोहिमेत ५०० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे व तो संकल्प पूर्ण करू, असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी राहुल पाटील यांनी चांगला उपक्र म हाती घेतल्याचे कौतुक केले. याप्रसंगी श्याम बगडाने उपस्थित होते.

Web Title: Plantation of 500 trees