प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 01:01 IST2021-05-09T21:19:48+5:302021-05-10T01:01:51+5:30

मनमाड : रेल्वे प्रशासनाने उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी गोरखपूर, दानापूर, दरभंगा, भागलपूर दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित चार विशेष ...

Planning of special trains for passengers | प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन

प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन

ठळक मुद्देउत्तर भारतात जाणाऱ्या चारही गाड्यांना मनमाडला थांबा

मनमाड : रेल्वे प्रशासनाने उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी गोरखपूर, दानापूर, दरभंगा, भागलपूर दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या चारही गाड्यांना मनमाड रेल्वेस्थानकावर थांबे देण्यात आले आहे.

१० मेनंतर विशिष्ट दिवशी सोडण्यात येणाऱ्या या गाड्यांमध्ये पुणे-गोरखपूर-पुणे विशेष (१० फेऱ्या), पुणे-दानापूर-पुणे विशेष अतिजलद (६ फेऱ्या), पुणे-दरभंगा-पुणे विशेष (४ फेऱ्या), पुणे-भागलपूर-पुणे विशेष (२ फेऱ्या) या गाड्यांचा समावेश आहे.
या सर्व गाड्यांना दौंड कॉर्डलाईन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ येथे थांबे देण्यात आले आहे. पूर्णतः आरक्षित विशेष ट्रेन/अतिजलद विशेष गाडी ०१३२९, ०१३३१ चे विशेष शुल्कासह बुकिंग ९ मे तर ०१३३३ चे विशेष शुल्कासह बुकिंग दि. १० मे रोजी व ०१३३५ चे विशेष शुल्कासह बुकिंग दि. ११ मे रोजी सर्व संगणकीकृत आरक्षणावरील केंद्रे आणि संकेतस्थळावर सुरू होईल. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे. (०९ मनमाड)

Web Title: Planning of special trains for passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.