बागलाणमध्ये अठरा गावांसाठी योजना मंजूर

By Admin | Updated: April 30, 2017 23:18 IST2017-04-30T23:17:52+5:302017-04-30T23:18:08+5:30

सटाणा : बागलाण तालुक्यातील पहिल्या टप्प्यात अठरा गावांसाठी सुमारे चोवीस कोटी रु पयांच्या पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या.

Plan approved for eighteen villages in Baglan | बागलाणमध्ये अठरा गावांसाठी योजना मंजूर

बागलाणमध्ये अठरा गावांसाठी योजना मंजूर

 सटाणा : बागलाण तालुक्यातील प्रत्येक गाव पिण्याच्या पाण्याबाबतीत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी पहिल्या टप्प्यात अठरा गावांसाठी सुमारे चोवीस कोटी रु पयांच्या पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. या योजनांचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करून त्यांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात टंचाईग्रस्त गावांना शुद्ध आणि मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ताहाराबाद, नामपूर, भाक्षी, आराई, नवी शेमळी, वटार, पिंपळदर, जोरण, खिरमाणी, अजमीर सौंदाणे, मळगाव, भामेर, भिलवाड, बिजोटे, चौगाव, कोदमाळ, इजमाणे, खमताणे या सोळा गावांसाठी सुमारे चोवीस कोटी
रुपयांच्या पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. चौगावसाठी सुमारे एक कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच निविदाप्रक्रिया राबवून कामाला प्रारंभ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जेणेकरून मे महिन्यात गावाला पाणीटंचाई भासणार नाही.
@ताहाराबाद, नामपूर, ब्राह्मणगाव, भाक्षी, अजमीर सौंदाणे, मळगाव भामेर, भिलवाड, नवी शेमळी, खमताणे या गावांचा विशेष संपुटमधून या योजनेत समावेश केला आहे. या वेळी सुमारे सतरा गावांच्या योजना मंजूर झाल्या असून, येत्या काही दिवसात त्यांनाही प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याचे सांगण्यात आले. मान्यता मिळाल्यानंतर निविदाप्रक्रि या राबविण्यात येणार असल्याचे डॉ.भामरे यांनी स्पष्ट केले. येत्या दीड वर्षात बागलाण तालुका टंचाईमुक्तकरण्याचा संकल्प केला असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Plan approved for eighteen villages in Baglan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.