सिन्नरफाटा चौकात खड्डे; वाहनधारकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:14 IST2020-08-28T23:58:32+5:302020-08-29T00:14:01+5:30
सिन्नरफाटा चौक व जुना ओढारोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे यामुळे वाहतुकीची कोंडी व छोटे-मोठे अपघात होत आहे.

सिन्नरफाटा चौकातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांनी अशी कसरत करावी लागत आहे.
नाशिकरोड : सिन्नरफाटा चौक व जुना ओढारोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे यामुळे वाहतुकीची कोंडी व छोटे-मोठे अपघात होत आहे.
सिन्नर फाटा चौकातून एकलहरा रोडकडे वळताना कॉर्नरवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. तसेच जुना ओढारोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहे. यामुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबर वाहनधारकांना शारीरिक त्रासदेखील सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील खड्डयांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्डयांचा अंदाज येत नाही. त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहे. तसेच सिन्नरफाटा चौकातून एकलहरारोड कडे वळताना खड्ड्यांमुळे वाहने हळू करावी लागत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सिन्नरफाटा चौक व ओढारोडवरील खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी वाहनधारक,परिसरातील रहिवाशांनी केली आहे.