शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात टमाटा व्यापाऱ्याला पिस्तूल लावून खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:22 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी विक्रीचे व्यवहार  करणाऱ्या एका टमाटा व्यापाऱ्याला तिघा संशयित आरोपींनी डोक्याला पिस्तूल लावून डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न करीत सायंकाळपर्यंत 50 हजार रुपये दिले नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.15) सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला आहे.

ठळक मुद्दे टमाटा व्यापाऱ्याला पिस्तूल लावून खंडणीची मागणी शेतकऱ्यांकडून माल न घेताच व्यापारी परतले माघारीबाजार समितीतील व्यापाऱ्यांमध्ये गुंडांची दहशत

नाशिक : दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी विक्रीचे व्यवहार  करणाऱ्या एका टमाटा व्यापाऱ्याला तिघा संशयित आरोपींनी डोक्याला पिस्तूल लावून डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न करीत सायंकाळपर्यंत 50 हजार रुपये दिले नाही तर जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.15) सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळच्या सुमाराला घडलेल्या घटनेमुळे शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्या शेकडो व्यापारी, आडत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दुपारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या सर्व संचालक मंडळाने पोलीस ठाण्यात धाव घेत झाल्याप्रकाराबाबत तपास करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे. बाजारसमितीत खंडणी मागणारे आरोपी दुचाकीवरून आल्याचे बाजारसमिती कॅमेऱ्यात कैद झाले आहे. काही दिवसांपूर्वी एका युवकाचा खून प्रकरणात सहभाग असलेले संशयित व त्यांचे हस्तक बाजारसमितीतील व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली करीत असल्याचे व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविले आहे. या प्रकारामुळे  बाजारसमितीत व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्यामाहितीनुसार,  बाजारसमितीत  सोमवारी सकाळी बाजारसमितीत टमाटा व्यापारी त्याच्या गाळ्यात असताना ऍक्टिव्हा दुचाकीवरून तिघे भामटे आले त्यांनी थेट त्या व्यापाऱ्याच्या गाळ्यात जाऊन त्याला शिवीगाळ करीत हातातील पिस्तूल डोक्याला लावून तर अन्य एकाने हातात दगड घेत डोक्यात मारण्याचा प्रयत्न करून संध्याकाळपर्यंत 50 हजार रुपये खंडणी दे नाहीतर जिवंत ठार मारू अशी धमकी दिली. सदर प्रकरणानंतर त्या व्यापाऱ्याने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. दरम्यान,अशा प्रकारे व्यापाऱ्याकडे खंडणी मागण्याचा प्रकार घडल्याने तसेच दोन ते तीन शेतकऱ्यांना मारहाण केल्यामुळे भयभीत झालेल्या 5 ते 6 व्यापाऱ्यांनी शेतमाल वाहनात न भरताचं बाजारसमितीतून काढता पाय घेतला. बाजारसमितीत गेल्या काही महिन्यांपासून गुंडाराज वाढला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे टोळके व खून प्रकरणातील संशयित व आरोपींचे हस्तक व्यापारी, आडत्यांना धमकी देत खंडणी वसूल करत असल्याचा धक्कादायक खुलासा व्यापाऱ्यांनी केला आहे. गुंड प्रवृत्तीचे टोळके शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांचा शेतमाल पळविणे, पैसे काढून घेणे असा प्रकार करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसMarketबाजार