आरोपीकडून पिस्तूल जप्त

By Admin | Updated: August 7, 2014 01:42 IST2014-08-07T01:16:17+5:302014-08-07T01:42:52+5:30

आरोपीकडून पिस्तूल जप्त

Pistol seized from accused | आरोपीकडून पिस्तूल जप्त

आरोपीकडून पिस्तूल जप्त

 

नाशिक : ठाणे येथील अमली पदार्थविषयक गुन्ह्यातील फरार आरोपी अशरफ अली शेख व त्याचा साथीदार रमाकांत कुलकर्णी या दोघा संशयितांकडून शहर गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या दोघांनाही भारतीय हत्त्यार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़ पंचवटीतील मृगनयनी सोसायटीतील गाळ्यामध्ये फरार आरोपी अशरफ अली उस्मानअली शेख (३६, रा़ काजूपाडा, मुंबई) व रमाकांत माधवराव कुलकर्णी (३६, रा़ मृगनयनी सोसायटी) या दोघांकडे पिस्तूल असल्याच्या मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेने कारवाई करून या दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून वीस हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Pistol seized from accused