शहरातील पाईप लिकेजवर वर्षाला सुमारे पाच कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:51+5:302021-02-05T05:41:51+5:30

नाशिक : शहरातील पाण्याची गळती कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असले तरी दररोज होणारी गळती ही त्रासदायक ...

Pipe leakage in the city costs around Rs five crore a year | शहरातील पाईप लिकेजवर वर्षाला सुमारे पाच कोटींचा खर्च

शहरातील पाईप लिकेजवर वर्षाला सुमारे पाच कोटींचा खर्च

नाशिक : शहरातील पाण्याची गळती कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असले तरी दररोज होणारी गळती ही त्रासदायक ठरली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून अशाप्रकारची गळती थांबविण्यासाठी वर्षाकाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च होत असतो. मात्र, त्यानंतरदेखील गळतीचे प्रमाण कमी झालेले नाही.

नाशिक महापालिकेत पाणीपुरवठा विभागाचे यांत्रिकी आणि वितरण असे दोन विभाग आहेत. त्यापैकी वितरण विभागाकडूनच मिळालेल्या माहितीनुसार शहरात शेकडो किलोमीटरच्या जलवाहिन्या आहेत. शहरात १ लाख ९७ हजार १७८ नळजोडण्या असून स्पेशल वॉटर मीटर १ लाख ९६ हजार ५१६ आहेत. वीस लाख लोकसंख्येला सरासरी ४६६ दश लक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ११० जलकुंभ आहेत. त्याला जोडणाऱ्या जलवाहिन्यांचा विचार केला तर शेकडो किलोमीटर्सच्या जलवाहिन्या आहेत. शहराचे क्षेत्रफळ मोठे असल्याने व्यापक स्तरावर विस्तारलेल्या जलवाहिन्या विविध कारणांमुळे फुटतात. त्या दुरूस्तीसाठी वार्षिक निविदा काढल्या जातात आणि दुरूस्तीचे काम केले जाते. सरासरी पाच कोटी रुपये अशाप्रकारच्या जलवाहिन्यांच्या दुरूस्तीसाठी खर्च हाेतो.

इन्फो..

४५०००००००

शहरातील पाणी पुरवठ्याचे बजेट

६०००००००

पाणी पुरवठ्यावरील वर्षाचे वीजबिल

१५०

पाणी पुरवठा संदर्भातील एकूण कर्मचारी

इन्फो..

लिकेजमुळे

१५ टक्के

पाणी वाया

इन्फो...

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यापूर्वी वाॅटर ऑडिट केले होते. त्यात ४२ टक्के नॉन रेव्हेन्यू वॉटर असल्याची नोंद असून त्यातच गळती देखील समाविष्ट आहे. २०१८ मध्ये महापालिकेने जलवाहिनीचे जाळे विणण्यासाठी कृती आराखडा तयार केला असून त्यानुसार काम सुरू आहे. २०६ कोटी रुपयांची कामे अमृत योजनेत सुचविण्यात आली आहे. त्यामुळे बऱ्याच जुन्या जलवाहिन्या बदलल्या जात आहेत.

कोट..

महापालिकेने जलवाहिन्यांच्या लिकेज थांबविण्यासाठी खासगी एजन्सीजची कंत्राट केले आहेत. विशिष्ट रकमेचे हे कंत्राट असल्याने गळती झाली तरी दुरूस्तीची कामे त्वरीत पुर्ण करण्यात येतात. मोठे काम असेल तर मात्र निविदा काढून करावे लागते.

- संदीप नलावडे, अधिक्षक अभियंता, पाणी पुरवठा (वितरण)

फोटो क्रमांक

गांधीनगर येथील जलशुध्दीकरण हा परिसरातील पाणीपुरवठा करण्यासाठी महत्त्वाचा आहे. याठिकाणी दिसायला साधी वाटणारी पाणी गळती मात्र अनेक महिन्यांपासून सुरू आहे. थेंब थेंब पाणी वाचविणे महत्त्वाचे असले तरी ही किरकोळ वाटणारी परंतु शेकडो लिटर पाणी वाया जाणारी ही गळती का दुर्लक्षित आहे, हे नागरिकांना कळत नाही.

फोटो क्रमांक

पंचवटीत फुले नगर येथील जलवाहिनीची गळती देखील अनेक महिन्यांपासून कायम आहे. हा झोपडपट्टी परिसर असल्याने त्याकडे महापालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे.

फोटो तीन

शहरातील सिडको भागात असलेली ही गळती. महापालिकेची सध्या रस्ते आणि गटारीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र, त्यामुळे देखील जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत आहे. मध्यंतरी मुंबई नाका येथे अशाचप्रकारे जेसीबीमुळे जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर्स पाणी वाया गेले होते. याबाबतदेखील महापालिकेला ठाेस पावले उचलावी लागणार आहेत.

Web Title: Pipe leakage in the city costs around Rs five crore a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.