नाशिक : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जनरेटर रूममधील सक्सेशन कॉम्प्रेसर यंत्रणेत अचानकपणे बिघाड झाला. जिल्हा रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर असलेल्या नवजात शिशुंच्या स्पेशल न्यु बॉर्न केअर युनीट अर्थात चिमुकल्यांच्या अतिदक्षता विभागाशी संबंधित ही यंत्रणा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या काळजात धस्स झाले. त्यामुळे सर्वत्र धावपळ उडाली. यंत्राचे पाइप अचानक फुटल्याने मोठा आवाज झाला. (Nashik District hospital generator room pipe blast. )
तत्काळ खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. यावेळी जनरेटर रूमला कुलुप लावलेले होते आणि ज्या ठेकेदाराकडे याची जबाबदारी आहे, त्याने नेमलेले तंत्रज्ञ ही येथून गायब होते. जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद येऊ लागले. अखेर जवानांनी वेळ न वाया घालविता कुलूप तोडले आणि आतमध्ये प्रवेश केला.
जिल्हा रुग्णालय नाशिक मध्ये आज रात्री साडेनऊच्या सुमारास ३ सक्शन युनिटपैकी एका युनिटमध्ये बिघाड झाल्याने मोठेयाने आवाज झाला. त्यामुळे ड्यूटीवर असलेला नर्सिंग कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी ताबडतोब वरिष्ठ अधिकारी,अग्निशमन विभाग, नाशिक महानगरपालिका,नाशिक आणि सरकार वाडा पोलीस स्टेशन यांना तात्काळ कळविले. टेक्निकल टिम ने येऊन समस्या सोडवली आहे.
या सक्शन युनिटचा आणि ऑक्सिजनचा काही एक संबंध नसुन ऑक्सिजन पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना कुठल्याही प्रकारची इजा नाही. तसेच सक्शन युनिट आणि ऑक्सिजन हे दोघे वेगळी बाब असल्याने कोणताही गैरसमज करू नये.- डॉ.के.आर. श्रीवास,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकजिल्हा रुग्णालय, नाशिक.