महिला रिक्षाचालकांची पिंक रिक्षा लवकरच रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:37 IST2021-02-05T05:37:46+5:302021-02-05T05:37:46+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने शहरात पुरेशी बससेवा नाही. पूर्वीच्या काळी असलेल्या खास महिला आणि विद्यार्थिंनीसाठी बसेस नाहीत. आता तर ...

Pink rickshaws of female rickshaw pullers soon on the road | महिला रिक्षाचालकांची पिंक रिक्षा लवकरच रस्त्यावर

महिला रिक्षाचालकांची पिंक रिक्षा लवकरच रस्त्यावर

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने शहरात पुरेशी बससेवा नाही. पूर्वीच्या काळी असलेल्या खास महिला आणि विद्यार्थिंनीसाठी बसेस नाहीत. आता तर जवळपास बससेवा बंदच आहे. अशावेळी रिक्षासारख्या खासगी प्रवासी साधनाचा वापर महिलांना करावा लागतो. परंतु हा प्रवास फारसा सुरक्षित नाही. काही समाजकंटक नावाला रिक्षाचालकांच्या नाावाखाली महिला आणि मुलींचा त्रास देत असतात. अनेक ठिकाणी तर विनयभंगाचे प्रकार घडल्याची पोलिसात तक्रारी आहेत. त्यामुळे दोन ते तीन वर्षांपूर्वी महापालिकेने पिंक रिक्षाची संकल्पना मांडली हाेती. यात महिला केवळ महिला प्रवांशासाठी ही रिक्षासेवा देणार आहेत. मात्र तीन वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. परंतु आता मात्र ही कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिकेने मागवलेल्या अर्जांना प्रतिसाद देत सुमारे साडेचारशे महिलांनी अर्ज केले आहेत, तर चार निविदा प्राप्त झाल्या असून, त्यावरदेखील लवकरच निर्णय होणार आहे.

कोट.. महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी पिंक रिक्षांची योजना अंतिम टप्प्यात आहे. रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक महापालिकेला दोन ते तीन वेळा मुदतवाढ द्यावी लागली होती. आता मात्र चार निविदा प्राप्त झाल्या असून, लवकरच त्यावर निर्णय घेण्यात आली. - अर्चना तांबे, उपआयुक्त, समाजकल्याण विभाग, महापालिका

-

Web Title: Pink rickshaws of female rickshaw pullers soon on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.