पिंपळगाव बसवंत : मध्य प्रदेशातून मुंबईला चोरीछुप्यामार्गाने गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनासह सुमारे ३३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांपी जप्त केला असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपळगाव, कोकणगाव शिवारातून पहाटेच्या सुमारास आयशर टेम्पोतून गुटखा (एमपी १३ जीए १४३३) मुंबईकडे जाणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून सदर वाहन व दोन आरोपींना ताब्यात घेतले. वाहनात तब्बल २२ लाख २० हजारांचा विमल कंपनीचा गुटखा, तर ११ लाख चार हजाराचे आयशर वाहन जप्त करण्यात आले आहे. याबाबत आरोपी नारायण राजाराम चव्हाण व जीवन रमेश चव्हाण (रा. इंदूर) दोघांवरपिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कांतिलाल पाटील, संजय पाटील, हवालदार कैलास देशमुख, संजय गोसावी, सुशांत मरकट, मंगेश गोसावी, सचिन पिंगळ, संदीप लगड, आदींच्या पथकाने केली.
पिंपळगावी ३३ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:03 IST